जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) मध्ये तणाव अधिक वाढत चालला आहे. पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी बऱ्याच वेळा परमाणू हल्ल्याची धमकी सुद्धा दिली आहे. पाकिस्तानच्या या धमकीचे उत्तर भारताकडून सडोतोड दिले जाईल असे बजावून सांगण्यात आले आहे. दोन्ही देशातील गेल्या काही महिन्यांच्या तणाव स्थितीदरम्यान अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये परमाणू युद्धाबाबत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, भारत-पाकिस्तानमध्ये परमाणू युद्ध झाल्यास 10 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना आपली जीव गमावा लागणार आहे.
सायन्स अॅडवान्स यांनी प्रदर्शित केलेल्या एका रिपोर्टनुसार, परमाणू युद्ध झाल्यास भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तर वैज्ञानिकांच्या मते दोन्ही देशादरम्यान परमाणू युद्ध स्थितीत पृथ्वीवर पोहचणारी सुर्याची किरणे अत्यल्प पडतील. याचा परिणाम पावसावर सुद्धा होईल. एवढेच नाही याचा थेट परिणाम जमीन आणि शेतीसह समुद्रातून मिळणाऱ्या उत्पादनावर ही होणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानकडे 400-500 परमाणु हत्यारे आहेत. त्यामुळे या हत्यांरांचा वापर युद्धात केल्यास याचा परिणाम वैश्विक पर्यावरणावर होणार आहे.तसेच दक्षिण एशियामध्ये परमाणू युद्धाचा प्रभाव तीन प्रकारचा पडण्याची शक्यता आहे.(18 Years of 9/11: जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात 3000 लोकांनी क्षणार्धात गमावला होता जीव)
- पहिला: परमाणु युद्ध स्थितीमध्ये विस्फोटांतून निघाणाऱ्या धुरामुळे 16 ते 36 मिलियन टन काळा कार्बन सोडण्याची शक्यता आहे. या कार्बनची तीव्रता एवढी जास्त असणार आहे की काही आठवड्यातच जगभरात त्याचा परिणाम दिसून येईल.
- दुसरे: परमाणु हल्ल्यानंतर सोलर रेडिएशन एकत्र करणार आहे. यामुळे हवेत अधिक उष्णता वाढणार असून धुर पुढे जाऊ शकणार नाही. तसेच पृथ्वीवर पोहचणारी उर्जेत 20 ते 35 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
-तिसरे: वायुमंडळात कार्बन अधिक वाढणार असून सुर्याची किरणे जमीनीवर पोहचणार नाहीत. त्यामुळे याचा परिणाम पावसावरही होणार आहे.
या रिपोर्टमध्ये वैज्ञानिकांनी असे सांगितले आहे की, भारत-पाकिस्तानमध्ये परमाणु युद्ध झाल्यास त्याचे परिणाम अत्यंत वाईट होणार आहेत. तर या परिणामधून बाहेर येण्यासाठी जगाला 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे.