Hypersonic Missile Attack in Ukraine: युक्रेनमध्ये हायपरसोनिक हल्ला; हे क्षेपणास्त्र किती धोकादायक आहे? भारताकडे अशी क्षमता आहे का? जाणून घ्या सविस्तर
Hypersonic Missile Representational image (PC- ANI)

Hypersonic Missile Attack in Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणखी सुरूचं आहे. शनिवारी, रशियन सैन्याने युक्रेनवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. रशियन संरक्षण मंत्रालयानेचं शनिवारी दावा केला की त्यांनी हायपरसॉनिक एरोबॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह युक्रेनियन क्षेपणास्त्रे आणि किंजेल एव्हिएशन मिसाईल सिस्टममधील विमानांसाठी दारुगोळा असलेले एक मोठे भूमिगत गोदाम नष्ट केले. रशिया-युक्रेन युद्धात हायपरसॉनिक शस्त्रे (Hypersonic Missile) वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे घेण्यासाठी महासत्ता असणाऱ्या देशांमध्ये स्पर्धा सुरू आहेत. विशेषत: हे क्षेपणास्त्र अमेरिका आणि चीनमध्ये चर्चेत राहिले आहे. हायपरसॉनिक मिसाइल म्हणजे काय? हे क्षेपणास्त्र धोकादायक का आहे? जगातील कोणत्या देशांकडे हे घातक शस्त्र आहे? भारताने ही क्षमता गाठली आहे का? यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात... (हेही वाचा - रशियाचे अध्यक्ष Vladimir Putin यांना हत्येची भीती; विषबाधा होण्याच्या शक्यतेने 1000 वैयक्तिक कर्मचार्‍यांच्या केल्या बदल्या)

हायपरसॉनिक मिसाइल म्हणजे काय?

हायपरसोनिक क्षेपणास्त्राची गणना सुपर विनाशकारी शस्त्र म्हणून केली जाते. हायपरसोनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या पाचपट वेगाने उड्डाण करताना त्यांच्या लक्ष्याकडे जाणारी क्षेपणास्त्रे. हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे गेल्या तीन दशकांनंतरचे सर्वात प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आहे. या अंतर्गत एखादे वाहन प्रथम क्षेपणास्त्राला अवकाशात घेऊन जाते. यानंतर क्षेपणास्त्रे इतक्या वेगाने लक्ष्याकडे जातात की, क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा त्यांचा माग काढू शकत नाही आणि नष्ट करू शकत नाही.

याशिवाय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रही हायपरसॉनिक वेगाने धावते, पण ते एका ठिकाणाहून सोडले की कुठे पडेल हे कळते. अशा परिस्थितीत या क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणे सोपे आहे. याशिवाय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर या क्षेपणास्त्रांची दिशा बदलता येत नाही. हायपरसोनिक क्षेपणास्त्राची दिशा बदलणे शक्य आहे. हे क्षेपणास्त्र शत्रू देशाच्या रणनीतीनुसार आपली दिशा बदलण्यास सक्षम आहे. ही क्षेपणास्त्रे वातावरणातील हायपरसॉनिक वेगाने त्यांच्या लक्ष्याकडे जातात. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे संरक्षण यंत्रणेद्वारे पकडली जात नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक बनते. ही क्षेपणास्त्रे रडारच्या कक्षेतही येत नाहीत. त्यामुळे या क्षेपणास्त्रांच्या लक्ष्याबाबत संभ्रम निर्माण होतो.

भारताकडे हायपरसॉनिक शस्त्र तंत्रज्ञान -

भारत हायपरसोनिक शस्त्रांच्या तंत्रज्ञानावरही काम करत आहे. भारताने यापूर्वीच त्याची चाचणी घेतली आहे. DRDO ने 2020 मध्ये मानवरहित स्क्रॅमजेटच्या हायपरसोनिक स्पीड फ्लाइटची यशस्वी चाचणी केली. त्याला हायपरसोनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वाहन म्हणतात. भारताचे हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल (HSTDV) 20 सेकंदांपेक्षा कमी वेळात चाचणी घेण्यात आले. त्याचा वेग ताशी 7500 किमी होता, परंतु भविष्यात तो वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. चीन या तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने भारत आपल्या सुरक्षा आणि सामरिक रणनीती अंतर्गत ते विकसित करत आहे.

रशियाने 2018 मध्ये लाँच केले होते किंजल क्षेपणास्त्र -

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हटले होते की हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या गतिशीलता आणि क्षमतांमध्ये रशिया हा जागतिक आघाडीवर आहे. या क्षेपणास्त्रांचा शोध घेणे आणि त्यावर मात करणे इतर देशांसाठी खूप कठीण आहे. किंजल क्षेपणास्त्रे 2018 मध्ये रशियाने लॉन्च केलेल्या शस्त्रास्त्रांच्या मालिकेचा भाग आहेत.

रशियाच्या इंटरफॅक्स वृत्तसंस्थेने सांगितले की, युक्रेनने युद्धात प्रथमच हायपरसॉनिक किंजेल प्रणालीचा वापर केला होता. रशियन लष्कराचे प्रवक्ते कोनाशेन्कोव्ह यांनी शनिवारी दावा केला की, रशियन सैन्याने बॅस्टियन कोस्टल मिसाईल सिस्टमचा वापर करून ओडेसा बंदर शहरातील युक्रेनचे लष्करी रेडिओ आणि टोपण केंद्रे नष्ट केली.