PM Modi at Houston Mega Event | (Photo Credits: ANI)

अमेरिका (America) मधील ह्युस्टन Huston) येथे 22 सप्टेंबरला पार पडलेल्या 'हाउडी मोदी' (Howdy Modi) या कार्यक्रमासाठी तब्बल 50 हजार लोकांची उपस्थिती दिसून आली. तसेच कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हाउडी कार्यक्रमाला उपस्थिती लावली असता त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच मोदी यांचे अमेरिका मधील दिग्गज मंडळीकडून कौतुक करण्यात आले. त्याचसोबत मोदी यांच्या उपस्थिती नंतर थोड्याच वेळात अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली. मात्र डोनाल्ड ट्रम्प येताच मोदी यांनी मैत्रीचा हात पुढे करत कार्यक्रमासाठी त्यांचे स्वागत केले.

येत्या पुढील काळात भारत-अमेरिका यांच्यामधील नाते एका वेगळ्या स्तरावर पोहचणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. त्याचसोबत डोनाल्ड ट्रम्प यांची हाउडी मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणजे एक स्वप्न असल्याचे भारतीय वंशाचे अमेरिकेतील पीयुष पटेल यांनी म्हटले. तसेच मोदी यांनी प्रथम इंग्रजी भाषेतून डोनाल्ड ट्रम्प यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच ट्रम्प यांनी सुद्धा मोदी यांच्या कामाचे कौतुक करत पुढील महिन्यात भारतात येणार असल्याचे कार्यक्रमादरम्यान जाहीर केले आहे.

मोदी यांनी ट्रम्प यांच्या भाषणानंतर 50 हजार नागरिकांना हिंदी मधून संबोधित करत त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीलाच मोदी यांनी ह्युस्टन येथे आपण आज एक नवा इतिहास बनताना पाहत असल्याची भावना व्यक्त केली. एवढेच नाही तर ह्सुस्टन आणि टेक्सास प्रशासानाचे कौतुक करत दोन दिवांसापूर्वीची परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली गेली याबद्दल ही सांगितले. तर हाउडी मोदी असे कार्यक्रमाचे जरी नाव असले तरीही मी एकटा नसून 130 कोटी भारतीयांच्या जनतेच्या आदेशावर मी काम करत असल्याचे मोदी यांनी कार्यक्रमावेळी म्हटले. हाउडी म्हणजे भारतात सर्वकाही छान सुरु असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.(Howdy, Modi! Live Update: डोनाल्ड ट्रम्प आता संपूर्ण ताकदसह दहशतवादाविरोधात लढण्यास तयार- नरेंद्र मोदी)

तर हाउडी मोदी कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी भारताबद्दल काही महत्वाचे मुद्दे सुद्धा उपस्थितीत करत त्याबाबत अधिक खुलासा करुन नागरिकांना सांगितले. यंदाच्या निवडणूकीत प्रथमच 8 कोटी तरुणांनी मतदान केले. पण सर्वाधिक मतदान महिलांनी केले असल्याची भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. तर लवकरच 'न्यू इंडिया' ही कॉनसेप्ट भारताला पाहायला मिळणार आहे. भारत पूर्वीपेक्षा अधिक वेगाने प्रगती करत असून गेल्या पाच वर्षात 130 कोटी भारतीयांनी मिळून प्रत्येक क्षेत्रात नवा इतिहास रचला असल्याचा आनंद मोदी यांनी व्यक्त केला.

त्याचसोबत काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या गोष्टीला फेअरवेल दिले असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. ती गोष्ट म्हणजे काश्मीर मधून कलम 370 हटवला असल्याची आहे. त्यामुळे आता काश्मीर आणि लद्दाख यांना भारतीयांसारखे समान हक्क दिले जाणार आहेत. तसेच मोदी यांनी कार्यक्रमावेळी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. तर अमेरिकेत झालेला 9/11 असो किंवा मुंबई मधील 26/11 दहशतवादी हल्ला असो यामागील दहशतवादी कोठे आहेत असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता लढाई करायची वेळ आली असून ट्रम्प सुद्धा दहशतवादाविरोधात उभे राहणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. भारत सध्या इन्फ्रास्ट्रक्चर, गुंतवणुक परिस्थिती तयार करत भारत पुढे जात असून गेल्या पाच वर्षात उत्तम विकास केला आहे. तर नुकत्याच कॉर्पोरेट टॅक्सबाबत घेण्यात आलेला निर्णय अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करेल असा विश्वास मोदी यांनी आजच्या हाउडी मोदी कार्यक्रमादरम्यान दर्शवला आहे.