-डोनाल्ड ट्रम्प आता संपूर्ण ताकदसह दहशतवादाविरोधात लढण्यास तयार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.

 गेल्या पाच वर्षांत 130 कोटी भारतीयांनी मिळून प्रत्येक क्षेत्रात नवा इतिहास घडवला असल्याची भावनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. 

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाउडी मोदी कार्यक्रमासाठी हिंदी भाषेमधून सुरुवात केली आहे. 

-भारतात पुढील महिन्यात येणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांची कार्यक्रमादरम्यान केली आहे.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे 300 दशलक्ष जण गरिबी मधून वर आले- डोनाल्ड ट्रम्प

-'अब की बार, ट्रम्प सरकार' म्हणत नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. 

- 'हाउडी मोदी' कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. तसेच मोदी यांच्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांची सुद्धा उपस्थिती दिसून येत आहे.-नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या नातेसंबंधाचे कौतुक केले आहे.

- 'हाउडी मोदी' कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. तसेच मोदी यांच्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांची सुद्धा उपस्थिती दिसून येत आहे.-नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या नातेसंबंधाचे कौतुक केले आहे.

-अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली असून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.


-नरेंद्र मोदी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सेल्फी काढत कार्यक्रमासाठीचा आनंद व्यक्त केला आहे.

-अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली असून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.


-नरेंद्र मोदी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सेल्फी काढत कार्यक्रमासाठीचा आनंद व्यक्त केला आहे.

Load More

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आज (22 सप्टेंबर) रोजी ह्युस्टन येथे तब्बल 50,000 हुन अधिक भारतीय व अमेरिकन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अवघ्या काहीच क्षणात हा बहुप्रतीक्षित सोहळा NRG स्टेडियम येथे सुरु होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.30 ते 11.30 पर्यंत हा कार्यक्रम सुरु असणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. स्पर्श शाह या भारतीय वंशाच्या १६ वर्षीय मुलाच्या राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. मोदी व ट्रम्प यांच्या भाषणापूर्वी टेक्सास आणि अमेरिकेतील तब्बल ४०० कलाकार मिळून एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. माध्यमाच्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी खास नवीन गाणी देखील लिहिण्यात आली आहेत.या सोहळ्याचे Youtube, Twitter and Facebookच्या माध्यमातून करण्यात येणारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

चला तर मग पाहुयात कुठे आणि कसा पाहता येईल Howdy, Modi कार्यक्रम..

फेसबुक

युट्युबवर सुद्धा Howdy, Modi हा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे

ट्विटर वर भारतीय पंतप्रधान कार्यालयाचे PMO या हॅण्डलवरून हा कार्यक्रम दाखवण्यात येईल.

नरेंद्र मोदी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून पुन्हा विजयी झाल्यावर पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यासाठी गेले आहेत. 21 - 27 सप्टेंबर या सात दिवसांच्या दौऱ्यात संयुक्त राष्ट्र महासभेला मोदी संबोधित करणार आहेत, मात्र तत्पूर्वी ह्युस्टन येथे हा खास सोहळा पार पडणार आहे. प्राप्त माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेचे संबंध संस्कृती आणि व्यापार या विषयांवर चर्चा होणार आहे.

यापूर्वी युनाइटेड स्टेट्स मध्ये दोन वेळा नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला आहे. 2014 मध्ये न्यूयॉर्क येथे मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये तर 2016 मध्ये सिलिकॉन व्हॅली येथे मोदींचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 20 हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. मात्र यावेळेस सर्वाधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.