Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar (Image Credits: X/@AdityaRajKaul)

शीख गुरुद्वाराबाहेर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यात संबंध तणावपूर्ण झाले आहेत. निज्जरच्या हत्येचं व्हिडिओ फुटेज आणि साक्षीदारांच्या माहितीवरून हे पूर्वी अंदाज आखलेल्या अहवालापेक्षा मोठे आणि अधिक संघटित ऑपरेशन असल्याचं समोर आल्याचे वृत्त देण्यात आले आहे. ज्यामध्ये किमान सहा व्यक्ती आणि दोन वाहनांचा समावेश आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, निज्जर वरील हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज अधिक रूढ करणारा आहे.

गुरू नानक शीख गुरुद्वाराबाहेर 18 जून रोजी झालेल्या निज्जरच्या हत्येच्या तपासाबाबत अधिकार्‍यांकडून माहिती न मिळाल्याबद्दल समुदाय सदस्यांनी निराशा व्यक्त केली आहे. कथितपणे मंद प्रतिसाद आणि आंतर-एजन्सी मतभेद यामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. जवळपासचे अनेक व्यवसाय मालक आणि रहिवासी माहिती किंवा सुरक्षा फुटेज शोधणाऱ्या तपासकर्त्यांकडून त्यांच्याशी याबाबत चर्चा किंवा संपर्क झाला नसल्याची प्रतिक्रिया देत आहेत.

निज्जरची हत्या गुरुद्वाराच्या सुरक्षा कॅमेर्‍याने कैद झाली आहे. जो चालू तपासासाठी महत्त्वपूर्ण पुरावा आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग घटनांचा एक क्रम दाखवत आहे, जेथे निज्जरच्या राखाडी पिकअप ट्रकचा पाठलाग केला गेला आणि शेवटी एका पांढऱ्या सेडानने त्याला अडवले, त्यानंतर सशस्त्र व्यक्ती ट्रकजवळ आला आणि त्याने गोळ्या झाडल्या. यामध्ये निज्जरचा मृत्यू झाला.

घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुमारे 50 गोळ्या झाडल्या आणि 34 निज्जरला लागल्या.

भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान, या अलीकडील घडामोडीने परिस्थितीचे गांभीर्य आणि या घटनेमागील सत्य उघड करण्यासाठी सखोल आणि निष्पक्ष तपासाची गरज पुन्हा कटाक्षाने अधोरेखित केली आहे.