(Representational Image/ Photo: Twitter @ahmedjnena2)

US-Iran Conflict: इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी (Qassim Suleimani) यांची अमेरिकेने हत्या केली. त्यानंतर अमेरिका इराणमध्ये तणावाचे संबंध निर्माण होऊन रॉकेट हल्ल्याच्या प्रतिउत्तराचे सत्र सुरू झाले. इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ शनिवारी रात्री 5 रॉकेट डागल्याची (Rockets Hit US Embassy) माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच इराणने हा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे.

सुलेमानी यांच्या हत्येनंतरही इराणने अमेरिकेच्या दूतावासावर अनेकदा क्षेपणास्त्र डागले होते. त्यामुळे शनिवारी झालेला रॉकेट हल्ला इराणने केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील आठवड्यात मंगळवारी इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ 2 रॉकेट डागण्यात आले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. इराणचे टॉप कमांडरच्या सुलेमानी यांच्या हत्त्येनंतर इराण नागरिकांकडून सूडाची मागणी होत होती. त्यामुळे इराणने अमेरिकेच्या लष्करी तळावर मागच्या महिन्यात अनेकदा रॉकेट हल्ले केले होते. (हेही वाचा - युक्रेनचे विमान चुकून पाडले; इराणी लष्कराकडून मोठा खुलासा)

अमेरिका-इराणच्या सूडाच्या कारवाईमुळे चुकून युक्रेनचं विमान अपघातग्रस्त झालं होतं. या विमानात 176 लोक मृत्यूमुखी पडले होते. या अपघातानंतर इराणने आपली चुक मान्य केली होती. अमेरिका-इराणमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या तणावाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहे.