व्यापाराच्या बाबतीत भारत सतत नवनवीन पायऱ्या चढत आहे. याच अनुषंगाने इतिहासात प्रथमच ब्लॉक ट्रेन (First Block Train) फिनलँडहून (Finland) भारतात पोहोचणार आहे. ही पहिली कंटेनर ब्लॉक ट्रेन फिनलँडमधील हेलसिंकी (Helsinki) ते भारतातील न्हावा शेवा कंटेनर बंदराला (Nhava Sheva Container Port) जोडणार आहे. 21 जून रोजी ही ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन स्वीडिश ग्राहकांकडून कागदाशी निगडीत उत्पादनांनी भरलेले 40 फुटाचे 32 कंटेनर वाहून आणत आहे. सध्या तेच प्रवास रशियामधून होत आहे. पुढे ती अझरबैजान पार करेल. ट्रेनचा पुढील स्टॉप इराणमधील अस्टारा आणि बंदर अब्बास बंदर असेल.
अब्बास बंदरातून कार्गोला एका जहाजावर आणले जाईल, जे हिंद महासागरातून समुद्रामार्गे त्याच्या अंतिम स्थानकावर पोहोचेल. ट्रेन सध्या ज्या मार्गावरून चालत आहे, हेलसिंकी ते अस्तारा दरम्यानचा मार्ग पूर्ण होण्यास आठ दिवस लागतील. अस्तारा अझरबैजान-इराण सीमेवर आहे.
नूरमीनन लॉजिस्टिकचे भागीदार RZD लॉजिस्टिकच्या मते, रेल्वेची एकूण प्रवासाची वेळ सुरुवातीच्या अंदाजे वेळेपेक्षा कमी असेल. विशेष म्हणजे, रशियन कंपनीने म्हटल्याप्रमाणे फिनलँड आणि भारत दरम्यानचा प्रवास 22 दिवसांपेक्षा जास्त होणार नाही. हेलसिंकी, फिनलँड ते न्हावा शेवा, भारत हा प्रवास कालावधी अंदाजे 25 दिवसांचा आहे.
फिनलँड आणि भारताला रेल्वेमार्गाने जोडण्याव्यतिरिक्त, ही विशेष सेवा नूरमिनेन लॉजिस्टिकसाठी एजून एका कारणासाठी एक मैलाचा दगड आहे. फिनिश कंपनी इतिहासातील पहिली लॉजिस्टिक ऑपरेटर आहे, जिने आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन कॉरिडोर (INSTC) च्या पश्चिम विंगेतून युरोपहून भारतात ब्लॉक ट्रेन पाठविली आहे.
INSTC हा 7,200 किमी लांबीचा मालवाहू मार्ग आहे जो भारत, इराण, अझरबैजान आणि रशियाला जहाज, रेल्वे आणि रस्त्याद्वारे जोडतो. या लाईनमुळे मुंबई ते मॉस्को दरम्यानचा प्रवास चाळीस दिवसांवरून चौदा दिवसांपर्यंत कमी झाला आहे. या कॉरिडॉरचा मुख्य हेतू. सुएझ कालवा, भूमध्य आणि बाल्टिक समुद्र याद्वारे पारंपारिक सागरी मार्गांना पर्यायी सुविधा पुरविणे हा आहे.