इथोपिया येथील अमेरिकेचा राजदूत (US Envoy To Ethopia) म्हणून काम करण्याची संधी एका भारतीय वंशाच्या महिलेला मिळाली आहे. गीता पासी (Gita Pasi) असे या महिलेचे नाव आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Americas President Donald trump) यांच्या सरकारने ही नियुक्ती केली आहे. 58 वर्षांच्या गीता पासी या 1988 पासून परराष्ट्र सेवेत कार्यरत आहेत. सध्या त्या अफ्रिकेविषयी संबंधित विभागाच्या प्रिन्सीपल डेप्युटी असिस्टंट सेक्रेटरी आहेत. या आधी त्या पूर्व अप्रिकेतील देश चाड आणि जिबूती येथील अमेरिकी दुतावासात कार्यरत राहिल्या आहेत.
गीता पासी यांनी अमेरिकी राजदूत म्हणून भारतातही काम केले आहेत. नवी दिल्ली येथील कार्यालयात त्या कार्यरत होत्या. तसेच त्या अमेरिकेतील दुतावासात डेप्युटी चीफ ऑफ मिशनही राहिल्या आहेत. त्यांनी अमेरिकेतील परराष्ट्र विभागात करिअर डेव्हलपमेंट आणि असाइनमेंट निदेशक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. 2009 ते 2011 पर्यंत त्या ब्यूरो फिसस ऑफ ईस्ट अफ्रीकन अफेयर्स च्या निदेशकही राहिल्या आहेत.
दरम्यान, गीता पासी यांना जर्मनी यथील फ्रँकफर्ट येथे अमेरिकी वाणिज्य दुतावासात डेप्युटी प्रिन्सिपल ऑफिसरची भूमिकाही निभावली आहे. याशिवाय त्यांना अफगानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि घाना या देशांमध्येही काम करण्याचा अनुभव आहे. त्या ड्यूक यूनिवर्सटीच्या पदवीधर आणि न्यूयॉर्क यूनिवर्सटीच्या एमए आहेत. (हेही वाचा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी मंंडळ अध्यक्षपदी निवड; 22 मे ला स्वीकारणार पदभार)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना चाड येथे अमेरिकीच्या राजदूत म्हणून नियुक्त केले होते. 2001 ते 2014 या कार्यकाळात त्या जिबूती येथे अमेरिकेच्या राजदूत राहिल्या आहेत. तर 2006 ते 2009 या काळात त्यांनी ढाका येथे अमेरिकी दूतावासात डेप्युटी चीफ ऑफ मिशन म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.