पाकिस्तानमध्ये अफगाणच्या राजदूतांच्या मुलीचे अपहरण, दोन तास त्रास दिल्यानंतर केली सुटका
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

पाकिस्तानमध्ये (Pakistan) असलेल्या अफगाणचे (Afghanistan) राजदूत नजीबु्लाह अलीखील यांच्या मुलीचे इस्लामाबाद येथून अपहरण करण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढला गेला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी एक विधान जाहीर करत असे म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानचे राजदूत यांची मुलगी सिलसिला अलीखील हिचे 17 जुलै रोजी इस्लामाबाद स्थित असलेल्या घरी परताना अपहरण करण्यात आले. अपहरण करण्यात आल्यानंतर तिला काही तास टॉर्चर ही केले गेले. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी तिला सोडून दिले. तिला आता एका रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.

अफगाणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेची निंदा करत पाकिस्तान सरकारकडे आपल्या राजदूतांसह त्यांच्या परिवाराची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की, या घटनेची आम्ही निंदा करत आहोत. तसेच त्यांनी आमच्या लोकांना कायदेशीर पद्धतीने योग्य ती सुरक्षितता पुरवावी अशी मागणी करत आहोत.(World's Most Powerful Passport: पुन्हा एकदा Japan चा पासपोर्ट ठरला जगात शक्तिशाली; Pakistan शेवटच्या 5 मध्ये, भारतालाही झटका)

Tweet:

मंत्रालयाने पुढे असे म्हटले की, आम्ही पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयासमोर हे प्रकरण उपस्थितीत करणार आहोत. त्याचसोबत या प्रकरणी तपास केल्यानंतर जे कोणीही गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा देण्याची मागणी करत आहोत.