Lockdown Again in Australia: कोरोना संक्रमित वाढले, अर्ध्या ऑस्ट्रेलियात पुन्हा लॉकडाऊन
Lockdown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या कमी व्हावी यासाठी अवघे जग प्रयत्न करत आहे. अनेक देशांनी लसीकरण मोहीम वेगाने राबवून कोरोना महामारी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी अद्यापही कोरोना पूर्ण नियंत्रण करण्यास कोणत्याच देशाला म्हणावे तसे यश आले नाही. उलट काही देशांमध्ये कोविड-19 (Covid 19) विषाणू संसर्ग पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारने तर जवळपास अर्ध्या देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown In Australia) लागू केला आहे. पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आल्यामुळे ऑस्ट्रेलियातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

ऑस्ट्रेलियात 18 महिन्यांहून अधिक काळ पोलीसंच्या निगराणीखाली लॉकडाऊन लागू होता. अशाच प्रकारचा लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये निराशेचे वातावरण पाहायला मिळत आहे. बीबीसीच्या हवाल्याने वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील जवळपास एक तृितियांश राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात दक्षिण ऑस्ट्रेलिया, विक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्स यांसारख्या काही राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा मंगळवारी करण्यात आली. ऑस्ट्रेलियामध्ये 14% पेक्षाही कमी नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे. ओईसीडी देशांमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगीरी अत्यंत वाईट आहे.

ऑस्ट्रेलियातील दोन महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सिडनी आणि मेलबर्न मध्ये पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट आहे की, ही शहरं पुन्हा कधी सुरु करावीत. यूके आणि यूएसमध्ये बऱ्यापैकी पूर्वस्थिती आल्याने इतर देशांतील सरकारांवर दबाव वाढला आहे. कोरोना लसीकरणाची गती कमी राहिल्याने पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. त्यांनी देशाची माफी मागावी असेही अवाहन होत आहे. परंतू, पंतप्रधानांनी त्यास विरोध केला आहे. (हेही वाचा: Norovirus in UK: कोविड-19 नंतर आता ब्रिटनमध्ये नोरोव्हायरसचा धोका; जाणून घ्या किती घातक आहे हा विषाणू)

ऑस्ट्रेलियायी पंतप्रदान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे की, कोणत्याही देशाला कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यास 100% यश आले नाही. ऑस्ट्रेलियाची जनता हे चांगलेच जाणते असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. इतर देशांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियानेही कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या कमी करण्यावर यश मिळवल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. दरम्यान विरोधकांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर जोरदार टीकास्त्र सोडत म्हटले आहे की, हे एक असे पंतप्रधान आहेत. जे नागरिक अडचणीत असताना हे पळून जातात.