Coronavirus (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी जगभरातील अनेक वैज्ञानिक अहोरात्र मेहनत करताना दिसत आहे. मात्र, कोरोनावर पूर्णपणे गुणकारी ठरेल, अशी लस निर्माण न झाल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु, अशा परिस्थितीतही चीनने आता भारताबाबत अफवा पसरवण्यास सुरूवात केली आहे. कोरोना विषाणू हा भारतातूनच जगभरात पसरला आहे, असा दावा चीनी वैज्ञानिकांनी (Chinese Scientists) केला आहे. परंतु, चीनचा हा दावा काही तज्ज्ञांनी खोडून काढला आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात सापडला होता. त्यानंतर या भयंकर विषाणूने जगभरात पसरायला सुरुवात केली. याबाबत सर्वांनाच माहिती आहे. परंतु, वुहानमध्ये सापडलेला कोरोना विषाणू खरा नसल्याचे चीनच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. तसेच कोरोना हा विषाणू बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, झेक रिपब्लिक, रशिया अथवा सर्बियामध्ये तयार झाला आहे. जुलै किंवा ऑगस्ट 2019 मध्ये पहिल्यांदा या विषाणूचा भारतातून प्रसार झाला आहे. तसेच भारतातील आरोग्य सेवा आणि तरूणांच्या मोठ्या संख्येमुळे अनेक महिने हा आजार ओळखू न येता असाच पसरत राहिला, असा दावाही चिनी वैज्ञानिकांनी केला आहे. हे देखील वाचा- Sputnik V Vaccine Update: भारतामध्ये HETERO सोबत RDIF करणार कोविड 19 वरील लसीचं उत्पादन

मात्र, चिनी वैज्ञानिकांचा हा दावा अन्य वैज्ञानिकांनी खोडून काढला आहे. चीनचा हा दावा दोषयुक्त आहे, याशिवाय त्यांच्या दाव्याची खात्रीही नसल्याचेही ब्रिटनमधील ग्लासगो विद्यापीठातील तज्ज्ञ डेव्हिड रॉबर्ट्सन यांनी डेली मेलशी बोलताना म्हणाले आहेत. यापूर्वी चीनने कोणत्याही प्रकारच्या पुराव्यांशिवाय अन्य देशांवर आरोप केले होते, असेही ते म्हणाले आहेत. सध्या जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक करोना विषाणूचा मुख्य स्रोत कोणता आहे याचा तपास करण्यासाठई चीनमध्येही आहे.

जगभरात आतापर्यंत एकूण 6 कोटी 21 लाख 1 हजार 294 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 14 लाख 51 हजार 592 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 कोटी 28 लाख 90 हजार 825 जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती वर्ल्ड ओ मीटर या वेबसाईटने दिली आहे.