Sputnik V Vaccine Update: भारतामध्ये HETERO सोबत RDIF करणार कोविड 19 वरील लसीचं उत्पादन
Sputnik V Vaccine (Photo Credits: File Image)

जगभरात आता कोविड 19 ला रोखण्यासाठी प्रभावी लस बाजारात आणण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात पोहचले आहेत. दरम्यान रशिया आणि भारत देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर यामध्ये एकत्र प्रयत करत आहेत. RDIF आणि भारतातील औषध कंपनी HETERO यांनी एकत्रपणे रशियाच्या SPUTNIK V VACCINE चे 100 डोस बनवणार आहेत. हे काम 2021 च्या सुरूवातीला सुरू होईल. दरम्यान रशियाची SPUTNIK V ही कोविड 19 वरील जगात पहिली उपलब्ध झालेली लस आहे. 11 ऑगस्ट 2020 दिवशी त्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे.

Sputnik V vaccine च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये त्याचा efficacy rate 91.4% असल्याचं सांगण्यात आले आहे. तर 95% लस प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. या लसीच्या मानवी चाचणीच्या पूर्ततेपूर्वीच ती बाजारात आणली आहे. सध्या त्याच्या फेज 3 क्लिनिकल ट्रायल्स बेलारूस, UAE, Venezuela आणि जगातील इतर देशांमध्ये सुरू आहेत. तसेच भारतामध्येही फेझ 2, 3 च्या चाचण्या सुरू आहेत. COVID-19 Vaccine Update: रशियाने विकसित केलेली Sputnik V लस क्लिनिकल ट्रायल्ससाठी भारतात दाखल

Sputnik V's Tweet

रशियामध्ये ऑगस्ट महिन्यात Sputnik V लॉन्च झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात EpiVacCorona चंदेखील रजिस्ट्रेशन झालं आहे. त्यासोबतच आता रशिया तिसर्‍या लसीवरदेखील संशोधन करत असल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार, Sputnik V ची किंमत प्रति डोस $10 ही आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये ठेवली जाणार आहे. भारताव्यतिरिक्त Sputnik V ही लस ब्राझिल, चीन आणि साऊथ कोरिया मध्ये देखील बनवली जाणार आहे.