Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे मागील अवघ्या 24 तासात अमेरिकेत तब्बल 100 हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागल्याचे धक्कादायक आकडेवारी सध्या समोर येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेचे नाव तिसऱ्या स्थानी आहे, चीन मधील ही परिस्थिती आता 80 टक्के सुधारल्याने इटली (Italy) या यादीत पहिल्या स्थानी असणारा देश आहे. वॉशिंग्टन (Washington) आणि न्यूयॉर्क (New York) मध्ये मृतांचे प्रमाण अधिक असून याच भागात कोरोनाच्या फैलावाची सुरुवात झाली होती. सद्य घडीला संपूर्ण जगात तब्बल 2 लाख 45 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन सहित भारतीय नागरिकांचा सुद्धा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण सुरुवातीच्या स्तरावर असतानाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली होती, नॅशनल इमर्जन्सी अॅक्ट अंतर्गत आरोग्य विभागाचा अधिकाधिक बजेट हा आजार रोखण्यासाठी वापरता येणार आहे, यानुसार, तब्बल 5 हजार कोटी म्हणजेच 50 अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आल्याचे सुद्धा ट्रम्प यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर सुद्धा अजूनही कोरोनाला थांबवणे अमेरिकेला शक्य झालेले नाही.

ANI ट्विट

दरम्यान, याहून भीषण परिस्थिती इटली मध्ये पाहायला मिळत आहे, इटली मध्ये आतापर्यंत 4 हजार 825 हुन अधिक जणांचा मृत्यु झाला आहे. भारतात सध्या कोरोनाचे 300 हुन अधिक रुग्ण आहेत तर आतापर्यंत 6  रुग्णांचा या जीवघेण्या आजाराने बळी घेतला आहे.