कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना विषाणुमुळे इटलीमध्ये (Italy) 24 तासांमध्ये 800 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे इटलीत मृतांची संख्या 4 हजार 825 वर पोहचली आहे. जगभरात 2 लाख 45 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे चीन तसेच इटलीला सर्वात मोठा फटका बसला आहे.
इटलीमध्ये शुक्रवारपासून 1 हजार 420 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 112 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत फ्रान्समध्ये 562 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 270 पेक्षा अधिक झाली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्ताची संख्या 63 वर पोहचली आहे. (हेही वाचा - उत्तर प्रदेश: मुंबईहून जाणारी 3000 प्रवाशांची 'पुणे पटना ट्रेन' थांबवली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांचं स्क्रिनींग)
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात कोरोनामुळे आतापर्यंत 11 हजार जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचं संक्रमण थांबवण्यासाठी देशात आज जनता कर्फ्यू ठेवण्यात आला आहे. आज सकाळपासून देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अनेक दिग्गज कलाकारांनी जनतेला घरात राहण्याचं आवाहन केलं आहे.