COVID-19: कोरोना व्हायरस मुळे अमेरिकेत आणीबाणी; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Donald Trump | Photo Credits: Twitter

चीन (China), इटली  (Italy) नंतर आता कोरोना व्हायरसचे (Corona Virus) संकट अमेरिकेला (America) सुद्धा दिवसागणिक हादरवून सोडत आहे, आतापर्यंत 110 हुन अधिक अमेरिकन्सना या जीवघेण्या संसर्गाची बाधा झाली असून यातील 40 लोकांचा मृत्यू झाला आहे, ही परिस्थिती लक्षात घेता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच अमेरिकेतून या व्हायरसला हटवण्यासाठी आणीबाणी जाहीर केली आहे अशा वेळी नॅशनल एमर्जन्सी अॅक्ट अंतर्गत आरोग्य विभागाचा अधिकाधिक बजेट हा आजार रोखण्यासाठी वापरता येणार आहे, यानुसार, तब्बल 5 हजार कोटी म्हणजेच 50 अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आल्याचे सुद्धा ट्रम्प यांनी सांगितले. काल, व्हाईट हाऊस येथे ट्रम्प यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अहमदनगर व मुंबई येथे आढळला कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण; Corona Virus मुळे दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा मृत्यू

अमेरिकन माध्यमांच्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणी घोषित करतानाच या व्हायरसने संक्रमित लोकांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे तसेच स्वच्छता राखणाऱ्या कामगारांचे, अधिकाऱ्यांचे सुद्धा कौतुक केले आहे. तसेच अमेरिकेतील सर्व राज्यांना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन ऑपरेशन सेंटर तात्काळ सुरू करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. 'वेळीस पाऊल उचलले नाही तर अमेरिकेतील 15  कोटी जनता या व्हायरसच्या कचाट्यात सापडू शकते, मात्र तसे होऊ नये म्ह्णून आपण तरतुदी करत आहोत, या काळात काही वेळेस नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल पण हा किंचित त्याग आपणा सर्वांच्या हितासाठी असणार आहे". असेही टर्म यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

Donald Trump ट्विट

दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाऱ्याच्या वेगाने होत आहे, आतापर्यंत तब्बल 1 लाख 38 हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली असून यातील मृतांचा जागतिक आकडा हा 5000 च्या घरात आहे. एकट्या चीन मध्येच या व्हायरसने 3180 बळी घेतले होते, तर इटली मध्ये सुद्धा 1000 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. भारतात सुद्धा हा आजार डोके वर काढत आहे, सध्या देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या जवळपास 85 इतकी आहे. गेल्या 36 तासांत 7  नव्या देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे.