भारताला अमेरिका-ब्रिटेन-फ्रान्स यांची साथ, मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनला अल्टिमेटम
मसूद अजहर (फोटो सौजन्य-Twitter)

जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) या दहशतवदी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर (Masood Azahar ह्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताला अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्स यांची साथ मिळाली आहे. युएन (UN) सुरक्षा परिषदचे स्थायी सदस्य अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्स यांनी मसूद अजहर ह्याला दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. परंतु चीनने अडथळले आणल्यामुळे आता त्याला अल्टिमेटम देण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्स यांना अजहर ह्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याठी प्रयत्न करत आहेत. मात्र चीन आपल्या विशेष अधिकारामुळे या प्रस्तावात तांत्रिक आधारावर अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता चीनला या तीन देशांनी येत्या 23 एप्रिल पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. चीनने या प्रस्तावाला थेट परिषदेत पाठींबा देण्यासाठी हा कालावधी देण्यात आला आहे.(हेही वाचा-जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची संपत्ती होणार जप्त; फ्रान्स सरकारचा निर्णय)

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव अनौपचारिकरित्या 15 देशांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे चीन या प्रस्ताववर जैशच्या भुमिकेमुळे आपला निर्णय बदलेल याची आशा बाळगली जात आहे. मात्र चीनने मसूदबद्दलची आपली भुमिका यापूर्वीसारखीच कायम ठेवली आहे.