जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची संपत्ती होणार जप्त; फ्रान्स सरकारचा निर्णय
JeM chief Masood Azhar (Photo Credits: PTI)

जैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammed) संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर (Masood Azhar) याच्याबद्दल फ्रान्स सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मसूद अजहर यांची फ्रान्स (France) देशात असलेली सर्व संपत्ती जप्त केली जाणार आहे. यूरोपीयन यूनियनने तयार केलेल्या संशयीत दहशतवाद्यांच्या यादीतही अजहर याचे नाव समाविष्ठ करण्याबाबत आपण पावले टाकू असे फ्रान्स सरकारने स्पष्ट केले आहे. मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्याच्या भारतायच्या प्रयत्नात चीन (China) या देशाने खोडा घातल्याच्या दुसऱ्याच दिवशी फ्रान्सने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुलवामा हल्ल्यातील मुख्य सूत्रधार जैश-ए-मोहम्मद

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अलकायदा प्रतिबंध समीती 1267 च्या अंतर्गत अजहर याच्यावरील बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकेने 27 फेब्रुवारीला सादर केला होता. जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्याने भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला केला होता. यात 40 जवान शहीद झाले होते. त्यामुळे संघटनेच्या कृत्याचे गांभीर्य ध्यानात घेऊन हा बंदी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. रॉयटर या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे.

भारताच्या प्रयत्नांत चीनचा खोडा

या घटनेनंतर भारत पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झाला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंदी प्रस्तावाबाबत उत्तर देण्यासाठी जैश-ए-मोहम्मदला 10 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत पूर्ण होण्याआगोदरच भारताचा शेजारी चीनने त्यात खोडा घातला. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी अणखी काही काळ अवधी आवश्यक आहे असे तांत्रिक कारण पुढे करत चीनने या प्रस्तावास विरोध दर्शवला आणि जैशवरील बंदी टळली. (हेही वाचा, न्यूझीलंड: क्राइस्टचर्च येथील 2 मस्जिदमधील गोळीबारात बांग्लादेश क्रिकेट संघ सुदैवाने बचावला)

एएनआय ट्विट

20 वर्षांपासून अधिक काळ जैश-ए-मोहम्मद संघटनेकडून दहशतवादी कृत्ये

पुलवामा हल्ल्याच्या सुमारे 20 वर्षे आगोदरपासूनच जैश-ए-मोहम्मद दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे. या संघटनेचा म्होरक्या असलेला मसूद अजहर हा 13 डिसेंबर 2001मध्ये भारतीय संसदेवर जालेल्या हल्ल्यातही सहभागी होता. या हल्ल्या 9 जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी 2016 मध्ये झालेल्या पटानकोट हल्ल्यातही जैश-ए-मोहम्मद संघटनेचाच हात होता. यात 7 जवान शहीद झाले होते. याच संघटनेने 2016 मध्ये उरी येथे दहशतवादी हल्ला केला यात 17 जवान शहीत तर, 30 जण जखमी झाले होते.