न्यूझीलंड क्राइस्टचर्च येथे मस्जिदमध्ये अंदाधुंद गोळीबार (फोटो सौजन्य-ट्वीटर)

न्यूझीलंड (New Zealand) क्राइस्टचर्च (Christchurch) येथील मस्जिदमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. या गोळीबारत अनेक जण गंभीर झाल्याची शक्यता आहे. तर न्यूझीलंड येथील पोलिसांच्या मते, क्राइस्टचर्च येथे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तर एक शूटर या ठिकाणी दिसून आल्याने पोलिसांकडून ही त्याच्या गोळीबाराल प्रतिउत्तर दिले जात आहे. परंतु अद्याप येथे भीतीचे वातावरण कायम आहे. तसेच स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार असे सांगितले जात आहे की, एका मस्जिदमध्ये खुप जण गंभीर जखमी झाले असून दुसरे मस्जिद मधील लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र ही घटना झाली त्यावेळी बांग्लादेश क्रिकेट संघातील खेळाडू तेथे उपस्थित असल्याचे दिसून आले.

बांग्लादेश क्रिकेट संघातील खेळाडू तमीम इकबाल ह्याने ट्वीटच्या मध्यमातून आमचा क्रिकेट संघ या गोळीबारातून सुदैवाने बचावला असल्याची माहिती दिली आहे. तर स्थानिक शाळा बंद करण्यात आल्या असून गर्दीच्या ठिकाणापासून दूर राहण्याचे नागरिकांना आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्याचसोबत कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरीत पोलिसात त्याबद्दल कळवावे असे ही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरिज सुरु आहेत. गुरुवारी क्राइस्टचर्च येथे तिसरा आणि अंतिम टेस्ट मॅच खेळली गेली. तर बांग्लादेश क्रिकेट संघ हा फेब्रुवारी महिन्यापासून न्यूझीलंड येथे आहे.