British Youtuber Miles Routledge (फोटो सौजन्य - X/@real_lord_miles)

Nuclear Bomb Attack on India: भारत आणि आफ्रिकेविरुद्ध वर्णद्वेषी वक्तव्य करून वादात आलेले ब्रिटीश YouTuber Miles Routledge यांनी 'मी भारतावर अण्वस्त्र हल्ला करेन. जो कोणी ब्रिटनच्या हितसंबंधांना आणि बाबींमध्ये अडथळा आणेल त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकणार,' अशी धमकी दिली आहे. त्याने सोशल मीडियावर भारतीयांची खिल्ली उडवताना एकामागून एक अनेक वर्णद्वेषी कमेंट केल्या आहेत. भारतीयांबद्दलच्या असंवेदनशील वर्णद्वेषी टिप्पण्यांबद्दल माईल्सला सोशल मीडियावर तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. यावेळी त्यांनी भारतीयांवर केवळ वर्णद्वेषी टिप्पणी केली नाही तर त्याविरोधात बोलणाऱ्यांची खिल्लीही उडवली आहे. त्याच्या टिप्पण्यांसाठी माफी मागण्याऐवजी, माइल्स त्याला प्रश्न विचारणाऱ्यांसाठी वाईट भाषा वापरत आहेत.

Miles Routledge ने एका मिम्स व्हिडिओद्वारे भारताविरुद्ध एक्सवर टिपण्णी केली. त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'जेव्हा मी इंग्लंडचा पंतप्रधान होईन, तेव्हा ब्रिटीशांच्या हित आणि व्यवहारात हस्तक्षेप करणाऱ्या कोणत्याही विदेशी शक्तीला स्पष्ट इशारा म्हणून मी न्यूक्लियर सायलो टाकेल.' (हेही वाचा -Pakistan Blast: पाकिस्तानमध्ये झाला नाही कोणताही स्फोट, फायटर जेटद्वारे झालेल्या Sonic Boom चा होता आवाज'; डेरा गाझी खानमधील स्फोटाच्या अहवालांवर शहर आयुक्तांचे स्पष्टीकरण (Watch))

माइल्स रूटलेजचे खाते लॉर्ड माईल्सच्या नावाने आहे. 126,000 पेक्षा जास्त फॉलोवर्स असलेला हा व्यक्ती तालिबानच्या ताब्यादरम्यान अफगाणिस्तानात अडकला होता आणि त्यानंतर 2021 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. लोक रुटलेजला डेंजर टूरिस्ट म्हणूनही ओळखतात. 2023 मध्ये तिसऱ्या भेटीत, रटलेजला तालिबानच्या गुप्तचरांनी आठ महिन्यांसाठी ताब्यात घेतले होते. (हेही वाचा - Russia-Ukraine War: युक्रेनच्या अनेक मोठ्या शहरांवर रशियन सैन्याचा क्षेपणास्त्र हल्ला, अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती)

या YouTuber ने याला एक अनुभव म्हटले होते. तसेच ही 'सर्वात आनंददायक सुट्टी' होती, असं म्हटलं आहे. आता, माइल्स रूटलेज भारतावर एकापाठोपाठ एक टिप्पणी करत आहेत. तसेच त्याच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांचीही तो खिल्ली उडवत असून त्यांना वाईट प्रत्युत्तरही देत ​​आहे.