सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये दावा करण्यात आला आहे की, शाहीन-III क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये ‘स्फोट’ झाला. शाहीन-III क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी झाल्याचा दावा काही अहवालांनी केला आहे, क्षेपणास्त्र डीजी खान परिसरातील अणु केंद्रावर आदळले आणि स्फोट झाला. मात्र डेरा गाझी खानचे आयुक्त नासिर महमूद बशीर यांनी एक निवेदन जारी करून हे दावे फेटाळले आहेत. या घटनेच्या अफवांचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. बशीर म्हणतात, ‘या ठिकाणी कोणताही ‘स्फोट’ झाला नाही, तर जो आवाज आला तो पाकिस्तानी हवाई दलाच्या फायटर जेटने साउंड बॅरिअर तोडल्याचा आवाज होता.’

दुसरीकडे, ज्या ठिकाणी स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल, रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. याआधी 2012 मध्ये तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी हा अणु तळ उडवून देण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून हा अणु तळ अत्यंत सुरक्षेत आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, या स्फोटाचा आवाज घटनास्थळापासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर ऐकू आला होता. (हेही वाचा: Russian Missile Strike in Ukraine: युक्रेनच्या खार्किव ओब्लास्टमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ला; किमान 48 ठार, 6 जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)