Russian Missile Strike in Ukraine: युक्रेनच्या खार्किव ओब्लास्टमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ला; किमान 48 ठार, 6 जखमी
मृतांमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. झेलेन्स्की यांनी या स्फोटाला, पूर्णपणे हेतुपुरस्सर दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे.
युक्रेनच्या खार्किव ओब्लास्ट (Kharkiv Oblast) रशियन सैन्याने हल्ला केला आहे. या ठिकाणी रशियन रॉकेटने एका छोट्या किराणा दुकानाला धडक दिली. यामध्ये जवळजवळ 48 लोक ठार झाले तर 6 जण जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. झेलेन्स्कीचे चीफ ऑफ स्टाफ, आंद्री येर्माक आणि खार्किवचे गव्हर्नर ओलेह सिनीहुबोव्ह यांनी सांगितले की, रशियन सैन्याने खार्किव प्रदेशातील ह्रोझा (Hroza) गावात दुपारी 1 च्या सुमारास दुकान आणि कॅफेवर गोळीबार केला. मृतांमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. झेलेन्स्की यांनी या स्फोटाला, पूर्णपणे हेतुपुरस्सर दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे. (हेही वाचा: Brazil Plane Crash Video: Cuiabá च्या Bom Futuro Airport वर King Air plane चा विचित्र अपघात; टेक ऑफ नंतर क्षणात होत्याचं नव्हतं झालं)
At least 48 killed, 6 injured by Russian missile strike on grocery store in Kharkiv Oblast
— BNO News (@BNONews) October 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2023 07:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

