Queen Elizabeth II | (Photo Credit: ANI)

ब्रिटनच्या सिंहासनावर सात दशकांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ 2 (Queen Elizabeth II) यांचं 8 सप्टेंबर रोजी निधन झालं असुन आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा लंडनमध्ये (London) सार्वजनिक पाहण्यासाठी खुली असेल. तरी जगभरातील दर्शक प्रमुख मीडिया चॅनेल (Media Channels) विविध प्लॅटफॉर्मच्या (Platform) माध्यमातून संपूर्ण जगाला हा अंत्यसंस्कार सोहळा लाईव्ह (Live) बघता येणार आहे. तसेच राणीला (Queen Elizabeth II ) श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो लोकांनी रांगेत उभे राहून महाराणी एलिझाबेथ 2 अंत्यदर्शन घेतलं आहे. किंग जॉर्ज सहावा मेमोरियल चॅपल येथे राणीला त्यांचे दिवंगत पती प्रिन्स फिलिप यांच्या बाजूला एका खाजगी शाही समारंभात दफन करण्यात येणार आहे.

 

वेस्टमिन्स्टर अॅबे (Westminster Abbey) येथे महाराणी एलिझाबेथ 2 (Queen Elizabeth II ) वर अंत्यसंस्कार पार पडणार आहे. ब्रिटिश (British) वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता पासून अंत्यसंस्कार (Funeral) विधीला सुरुवात होणार आहे तर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार संपन्न होईल. भारतातील दर्शक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता या अंत्यसंस्काराचं थेट प्रक्षेपण केल्या जाईल. बीबीसी वन (BBC One), बीबीसी न्यूज (BBC News), बीबीसी आयप्लेअर, स्काय न्यूज (Sky News) आणि स्काय न्यूज अॅपसह (Sky News App) विविध चॅनेलवर अंत्यसंस्कार थेट प्रक्षेपित केले जातील. लोक ते YouTube आणि Freeview वर अशा सोशल मिडीया (Social Media) माध्यमावर देखील महाराणीचा अंत्यसंस्कार विधी बघता येणार आहे. (हे ही वाचा:- Taiwan Earthquake: तैवानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप तर पुढील काही तासांत त्सुनामीचा धोका)

 

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ 2 (Queen Elizabeth II ) यांच्या अंत्यस्कारासाठी अमेरिकेचे (America) अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) आणि भारताचे अध्यक्ष द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी लंडनमध्ये (London) हजेरी लावली आहे. राणीच्या अंत्यसंस्काराला ब्रिटीश राजधानीने पाहिलेली “सर्वात मोठी सुरक्षा ऑपरेशन” म्हणून ओळखले जात आहे. कारण येथे जगातील सगळे मोठे मोठे नेते हजेरी लावणार आहे वेस्टमिन्स्टर अॅबे (Westminster Abbey) येथील शासकीय अंत्यसंस्काराला 2,000 मान्यवर उपस्थित असतील, तर विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपल येथे 800 अतिथी असतील.