Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

आग्नेय तैवानला (Taiwan) 6.9 रिश्टर स्केल भूकंपाचे (Earthquake) हादरे बसलेले आहेत. तरी पुढील काही तासांत 300 किलोमीटर किनारपट्टी परिसरात त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने (USGS) याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. ग्रामीण आग्नेय तैवानमधील (southeastern Taiwan) चिशांग टाउनशिपला (Chishang township) भूकंपाचे (Earthquake) अधिक प्रमाणात धक्के बसले आहेत. जपानच्या (Japan) हवामान (Meteorological Agency) संस्थेने पूर्व चीन समुद्रातील (East China Sea) मियाको बेटासाठी (Miyako Island) सुनामीचा इशारा जारी केला होता परंतु काही कालावधीनंतर तो अलर्ट (Alert) काढून टाकण्यात आला होता. तरी  6.9 तीव्रतेच्या भूकंपाने मोठं नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे.

 

शक्तिशाली भूकंपानंतर दक्षिण तैवानमध्ये (South Taiwan) कोसळलेल्या इमारती फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Social Media Viral) होताना दिसत आहेत.तरी काही इमारतींच्या खाली लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मोठ्या भूकंपानंतर आग्नेय तैवानचं मोठं नुकसानं झालं आहे. धावत्या रेल्वे (Railway), शाळा (School), सार्वजनिक ठिकाणांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती सीएनएन (CNN) कडून प्रसारित करण्यात आली आहे. (हे ही वाचा:-Plane Accidenet: धक्कादायक! दोन विमान एकमेकांवर आदळून भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू)

 

भूकंपानंतर तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन (President Tsai Ing-wen) यांनी बेटाचे केंद्रीय आपत्कालीन ऑपरेशन (Central Emergency Operation) करण्यास तातडीने सुरुवात केले आहे. तरी युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार संभाव्य त्सुनामी संबंधात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून (Taiwan Defense Ministry) तैवानच्या पूर्व किनारपट्टीवर सैनिक तैनात करण्यात आले आहेत.