King Charles III | (Photo Credit: Archived, edited, representative images)

इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ (Queen Elizabeth Death) यांचे निधन झाले. त्यानंतर इंग्लंडच्या राजेशाहीची सर्व सूत्रे राणीचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे आली. त्यांना तातडीने राजा घोषीत करण्यात आले. त्यामुळे सहाजिकच इंग्लंडच्या राजा किंवा राणीला मिळणाऱ्या सर्व सुखसोई राजे चार्ल्स (King Charles) यांना मिळणार आहे. या सुखसोयींची यादी प्रचंड मोठी आहे. चार्ल्स हे इंग्लंडच्या एकूण साम्राज्याचे प्रमुख असतील.बोलले जात आहे की, इंग्लंडच्या राजाचा वाढदिवस वर्षातून दोन वेळा साजरा करण्याची परंपराही ते सुरु करु शकतात. घ्या जाणून इंग्लंडच्या राजाला मिळणाऱ्या सुखसोई आणि इतर बरंच काही.

कोणताही परवाना अथवा पासपोर्टची मुळीच गरज नाही

राजा चार्ल्स III हे जगभरातील कोणत्याही देशात विना परवाना आणि पासपोर्टशिवाय फिरु शकतात. त्यांना इतर राजघराण्यांप्रमाणे पासपोर्टची मूळीच गरज भासणार नाही. कारण इंग्लंडचा पासपोर्टच मुळी राजाच्या नावे जारी होतो. त्यामुळे इंग्लंडचा राजा हा त्या देशातील एकमेव व्यक्ती असतो जो कोणत्याही परवाण्याशिवाय वाहन चालवू शकतो आणि मुक्तसंचार करु शकतो.

एक राजा दोन वाढदिवस 

चार्ल्स यांच्या आई महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचा जन्मदिवस वर्षातून दोन वेळा साजरा होत असे. पहिल्यांदा त्यांचा खरा वाढदिवस जो जन्मतारखेवरुन येतो तो साजरा केला जात असे एलिजाबेथ द्वितीय यांचा वाढदिवस 21 एप्रिल रोजी साजरा होत असे. दूसरा वाढदिवस अधिकृतपणे सार्वजनिक पद्धतीने साजरा होतो. जो जून महिन्यातील दूसऱ्या मंगळवारी साजरा करण्याची पद्धत होती. हा काळ काहीसा उन्हाळ्यातील असतो. याकाळात परेड करणे सहज शक्य होते. (हेही वाचा, Queen Elizabeth II यांच्या निधनानंतर King Charles III यांच्याकडे राजगादीची सूत्रं; पहा पुढील वारसदारांचा क्रम!)

चार्ल्स यांचा वाढदिवस थंडीच्या दिवसात 14 नोव्हेंबरला असतो. हा काळा जाहीरपणे वाढदिवस साजरा करण्यासाठी काहीसा अनुकूल नसतो. कारण प्रचंड थंडी असते. त्यामुळे ते आपला वाढदिवस उन्हाळ्यात अधिकृतरित्या साजरा करु शकतात. तशी परंपरा ते पुन्हा नव्याने साजरा करु शकतील. राजाचा वाढदिवस सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा फार जुनी 250 वर्षांची आहे. यात 1400 पेक्षा अधिक सैनिक, 200 घोडे आणि 400 संगितकार अशी मोठी सैनिकी परेड असते.

रॉयल अफेअर्स या परेडला एक फ्लाइ-पास्टने सम्प्त करते. जेणेकरुन सेंट्रल लंडनमध्ये शाही परिवारातील लोक आपल्या बल्कनीतून हा सोहळा पाहतात.

राजा मतदान करत नाही

इंग्लंडचा राजा कधीही मतदान करत नाही. तसेच, तो कोणत्याही निवडणुकीलाही उभा राहात नाही. देशाचा सर्वोच्च अधिकारी असल्यामुळे त्यांना राजकीय प्रकरणांमध्ये अगदीच तटस्थ राहावे लागते.

राज-हंस, डॉल्फिन और स्टर्जन

ब्रिटीश राज्यकर्ते केवळ इंग्लंडच्या लोकांवरच राज्य करत नाही तर ते 12 शतकापासून इंग्लंड आणि वेल्सच्या म्यूट राज हंस ( mute swans) हीसुद्धा राजाचीच संपत्ती आहे. प्रत्येकवर्षी थेम्स नदीमध्ये राजहंसांची मोजदाद होते. महत्त्वाचे म्हणजे हे राजहंस आता एक सुरक्षेचे अंगही मानले जातात. हाच राजेशाही अधिकार, स्टर्जन मासे आणि डॉल्फीनवरही लागू असतात.

राजकवी

साधारण 17 व्या शतकापासून प्रत्येक 10 वर्षांनी इंग्लंडमध्ये एक कवी साहित्यकार नेमला जातो. जो राजा/राणीसाठी कविता लिहितो. कॅरन एन डफी पहिली महिला होती जिला 2009 मध्ये म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तिने 2011 मध्ये प्रिन्स विल्यम यांच्या विवाहासाठी कविता लिहीली होती. महाराणीच्या सत्तेच्या 60 व्या वर्धापन दिनी 2013 मध्ये कविता लिहीली होती. पुन्हा 2018 मध्ये त्यांनी प्रिन्स हॅरी यांच्या विवाहावेळी कविता लिहीली होती.

दरम्यान, राजसाठी रॉयल वॉरन्टही असणार आहे. हे त्याच लोकांना लागू होते. जे शासकाला नियमीत रुपात सामान (साहित्य) सेवा देतात. हे वॉरन्ट म्हणजे विशेष सन्मानच असतो. त्यामुळे त्याची विक्रीही वाढते. यात Burberry, Cadbury, Jaguar Cars, Land Rover, Samsung आणि Waitrose सुपरमार्केट यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना आतापर्यंत हे रॉयल वॉरन्ट मिळाले आहे.