भारत बायोटेकच्या Covaxin लसीसाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून मान्यता, प्रवाशांना मिळाला दिलासा
Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

ऑस्ट्रेलियाच्या सरकारने भारत बायोटेकची कोरोनावरील लस कोवॅक्सिनला (COVAXIN) परवानगी दिली आहे. भारतात ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ'फेरल एओ यांनी याची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ऑस्ट्रेलियाच्या सरकारने प्रवाशांसाठी लसीकरणाच्या उद्देषाने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता भारतीय प्रवाशांनी जरी कोवॅक्सिनची लस घेतली असेल तर त्यांना ऑस्ट्रेलियात प्रवास करता येणार आहे.

पीएम मोदी यांनी रोम मध्ये जी20 शिखर संम्मेलनात असे म्हटले होते की, पुढील वर्षाच्या अखेर पर्यंत 5 अरब लसीचे डोस बनवण्यासाठी तयार आहोत. विदेश सचिव हर्षवर्दन श्रृगला यांनी पंतप्रधानांच्या हवाल्याने असे म्हटले की, लसीचे डोस हे मोठ्या प्रमाणात जगाला उपलब्ध करुन दिले जातील. त्याचसोबत आम्ही हे सुद्धा मानतो की, कोवॅक्सिनसाठी WHO WHO चे आपत्कालीन वापर प्राधिकरण इतर देशांना मदत करण्याच्या या प्रक्रियेचा सन्मान करेल.(PM Modi-Pope Francis Meet: तब्बल 21 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांनी व्हॅटिकनमध्ये घेतली पोपशी भेट; जाणून घ्या पीएम नरेंद्र मोदी व पोप फ्रान्सिसमध्ये काय झाली चर्चा)

Tweet:

Covaxin ला हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने विकसित केली आहे. 9 जुलैला पहिल्यांदाच लसी संबंधित डेटा WHO कडे पाठवण्यात आला होता. तेव्हा लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्याची मागणी केली होती. या प्रक्रियेत अधिकाधिक 6 आठवड्यांचा कालवधी लागतो.

जर एखाद्या कंपनीने तिच्या लसीचा डेटा सादर केला असेल, तर WHO 6 ते 9 आठवड्यांत सांगेल की ती लस आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली जाईल की नाही. त्यानुसार ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत कोवॅक्सिन वापरण्यास परवानगी द्यायला हवी होती, मात्र आज 111 दिवस उलटून गेले तरी त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.