AUKUS: साम्राज्यवादी चीन विरोधात तीन देशांची आघाडी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिका यांची रणनिती
Submarine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

साम्राज्यवादी चीन महासत्ता होण्याची स्वप्ने पाहात आहे. दरम्यान, चीनच्या साम्राज्यवादी धोरणाला पायबंद घालण्यासाठी संयुक्त राष्ट्र अमेरिका (United States of America), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (UK) असे तीन देश एकत्र आले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली या तीन देशांनी एका गटाची स्थापना केली आहे. एयूकेयूएस (AUKUS) नावाने हा गट ओळखला जाईल. इंडो पॅसिफीक सागरी क्षेत्रात वाढता हस्तक्षेप, युद्धखोरीचे धोरण, सातत्याने लष्करी बळकटीवर देण्यात येणारा भर यांसारख्या अनेक गोष्टी चीन सातत्याने करत असतो. चीनच्या या धोरणालाच आळा घालण्यासाठी हा गट काम करणार आहे. हा गट सुरक्षा, तंत्रज्ञान, विज्ञान आदी बाबतीत एकमेकांना सहकार्य करेन. तसेच, या गटात झालेल्या करारानुसार ऑस्ट्रेलियाने 90 बिलीयन डॉलर्सचा व्यवहार रद्द करुन पानबुडी बनविण्याचे काम अमेरिकेला दिले आहे. त्यामुळे फ्रान्स ऑस्ट्रेलियावर चांगलाच चिडला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि इंग्लंडचे पंतपरधान बोरिस जॉनसन यांच्यात एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. या बैठकीत जो बायेडेन यांनी म्हटले की, AUKUS, QUAD आणि ASEAN मित्रासाठीही योगदान देईल. त्यामुळे या मिटींगमुळे चीन नक्कीच नाराज होईल. दरम्यान, या बैठकीमुळे फ्रान्सही नाराज झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यांच्यात पाणबुडी निर्मितीसाठी 90 बिलीयन डॉलर्सचा करार झाला होता. 90 बिलियन डॉलर्सच्या बदल्यात फ्रान्स ऑस्ट्रेलियाला पाणबुडी देणार होता. हा करार ऑस्ट्रेलियाने या बैठकीनंतर रद्द केला. आता अमेरिका ऑस्ट्रेलियाला परमाणू उर्जेवर चालणारी एक पाणबुडी देणार आहे.

बायडेन यांनी म्हटले की, ऑस्ट्रेलियाला परमाणू उर्जेवर चालणारी पाणबुडी मिळाल्यानंतर या देशाच्या सुरक्षेत भक्कम वाढ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा समुद्री धोका वेळेतच निपटता येऊ शकतो. दरम्यान, बायडेन यांच्यासह अन्य देशांनीही हे स्पष्ट केले की, या पाणबुड्या हत्यारबंध असणार नाहीत. परंतू, परमाणू रिअॅक्टर्सकडून चालवली जातील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी नंतर घोषणा केली की, ऑस्ट्रेलिया दूरवर मारा करणारी यूएस टॉमहॉक क्रुझ क्षेपणास्त्रेही खरेदी करेन. (हेही वाचा, पश्चिम समुद्री ताफ्यात लवकरच आण्विक पाणबुडी दाखल होणार; भारत-रशिया खरेदी करार अंतिम टप्प्यात)

दरम्यान, तीन्ही देशांच्या नेत्यांनी AUKUS बैठकीत एकमेकांना सहकार्य करण्याची भाषा केली असली तरी त्यात चीनचा उल्लेख कुटेच नाही. परंतू, त्यांचा हेतू स्पष्ट होता. काहीही करुन चीनला रोखणे.