Air India New Logo | (PC - ANI/X)

Bangladesh Clashes: बांगलादेशातील राजकीय अशांततेदरम्यान, ढाकाहून एअर इंडियाचे विमान( Air India flight) बुधवारी पहाटे 205 प्रवाशांसह दिल्लीत दाखल झाले. एअर इंडियाने काल रात्री उशिरा ढाका विमानतळावर पायाभूत सुविधांचा अभाव असूनही विशेष चार्टर विमान चालवले आणि आज पहाटे दिल्लीत उतरले. फ्लाइटमधील एका प्रवाशाने सांगितले की, 'बांगलादेशातील परिस्थीती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. उद्यापासून सर्वकाही पूर्णपणे कार्य करेल. कारखाने, कार्यालये, बँका, महाविद्यालये, शाळा. सर्व काही चालू आहे.' शेख हसीना (Sheikh Hasina)देश सोडून गेल्याने लोकांना आनंद होत असल्याचेही प्रवाशाने नमूद केले. मात्र, देशात असे काही लोक आहेत, जे या गोष्टीला एक चूक मानतात. (हेही वाचा: Muhammad Yunus यांच्या हातात बांग्लादेश ची धुरा; अंतरिम सरकार च्या प्रमुखपदी निवडीची घोषणा)

बांगलादेशात 5 ऑगस्ट रोजी वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने बांगलादेशला राजकीय परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी कोटा प्रणाली संपुष्टात आणण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनांचे पडसाद आता उमटत आहेत. बांगलादेशातील आणखी एक प्रवासी सौरदिप रॉय म्हणाले, 'अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक विद्यार्थी मारले गेले. अधिकृतपणे 200 हून अधिक विद्यार्थी मारले गेल्याचा आकडा समोर आला आहे. मात्र, अनधिकृतपणे 1000 विद्यार्थी मारले गेलेत.'(हेही वाचा:US Revokes Sheikh Hasina's Visa: बांगलादेशातून हकालपट्टी केल्यानंतर अमेरिकेने रद्द केला शेख हसीना यांचा व्हिसा )

दरम्यान, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्याबाबतची माहिती ढाका ट्रिब्यूनने दिली. बांगलादेशच्या राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी जॉयनल अबेदिन यांनी ही घोषणा केली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखाच्या नियुक्तीचा निर्णय अध्यक्ष शहाबुद्दीन आणि भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीच्या समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की 'बांगलादेशमध्ये अंदाजे 19,000 भारतीय नागरिक आहेत. ज्यात सुमारे 9000 विद्यार्थी आहेत. आमचे सरकार ढाकामधील भारतीय समुदायांच्या संपर्कात आहे.'

जयशंकर यांनी लोकसभेत माहिती दिली की, 'बहुतांश विद्यार्थी जुलैमध्ये भारतात परतले आहेत. आम्ही बांगलादेशमधील भारतीय समुदायांच्या जवळ आणि सतत संपर्कात आहोत. बहुतांश विद्यार्थी जुलैमध्ये परतले," असे ते म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताला अत्यंत कमी नोटीसवर येण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आणि ती सोमवारी संध्याकाळी त्या आल्या.

दरम्यान देशात 5 ऑगस्ट रोजी, कर्फ्यू असूनही ढाकामध्ये निदर्शक एकत्र आले. तेथील सुरक्षा आस्थापनांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी स्पष्टपणे राजीनामा दिला.