नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस (Muhammad Yunus) यांच्याकडे आता बांग्लादेश सरकारची सूत्र देण्यात आली आहे. त्यांना अंतरिम सरकारचे प्रमुख करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ आता प्रमुख असतील. राष्ट्रपती, सेना आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 'गरीबांचे बॅंकर' म्हणून ओळख असलेले मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून आंदोलक विद्यार्थ्यांचीही पहिली पसंत होते.मागील काही महिन्यांपासून बांग्लादेश सरकार विरूद्ध आंदोलनं सुरू होती यामध्ये सरकारच्या विरूद्ध वाढती आंदोलनं पाहून माजी पंतप्रधान शेख हसिना यांनी देश सोडला आहे. Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचारामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI व चीनचा हात? अहवालात समोर आली धक्कादायक माहिती .
Muhammad Yunus बनणार देशाचे प्रमुख
Nobel laureate Muhammad Yunus appointed as Bangladesh interim govt's head
Read @ANI Story | https://t.co/gTpLzsLFah#MuhammadYunus #Bangladesh #SheikhHasina pic.twitter.com/QS1vhMDZNe
— ANI Digital (@ani_digital) August 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)