LAC वर गस्तीबाबत भारत आणि चीनमध्ये करार (फोटो सौजन्य - X/@SecularRaj)

India-China Border Dispute: पूर्व लडाख (Eastern Ladakh) मधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त व्यवस्थेबाबत भारत आणि चीन (India And China) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री (Foreign Secretary Vikram Mishri) यांनी सांगितले की, चीनसोबत चर्चेनंतर आम्ही एक करार केला आहे, ज्यामुळे सीमेवरील वादग्रस्त प्रश्न सोडवण्याच्या दिशेने प्रगती होत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या चर्चेनंतर हा करार झाला आहे. हा करार विशेषतः डेपसांग आणि डेपचोक भागात गस्त व्यवस्थेशी संबंधित आहे. 2020 पासून सीमेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये हा करार एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले होते, तर अनेक चिनी सैनिकांचाही मृत्यू झाला होता. भारत आणि चीनमधील या करारानंतर दोन्ही देशांचे सैन्य टप्प्याटप्प्याने सीमावर्ती भागातील माघारी येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा - India-China Border Dispute: चीनने Arunachal Pradesh मधील 30 ठिकाणांची नावे बदलण्याच्या कृत्यावर भारताचे सडेतोड उत्तर- 'अरुणाचल प्रदेश हे राज्य भारताचे आहे आणि पुढेही राहील')

LAC वर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण करार - 

22 ऑक्टोबरपासून सुरू होणार शिखर परिषद -

22 ऑक्टोबरपासून शिखर परिषद सुरू होणार आहे. शिखर परिषदेचा मुख्य दिवस 23 ऑक्टोबर आहे. या परिषदेचे दोन मुख्य सत्रे असतील. सकाळच्या सत्रानंतर, शिखर परिषदेच्या मुख्य विषयावर दुपारी खुले सत्र होईल. 24 ऑक्टोबरला शिखर परिषद संपणार आहे. (हेही वाचा - US on India China Border Dispute : चीनच्या अरुणाचल प्रदेशवरील दाव्याला अमेरिकेचा विरोध; सातत्याने चुकीचा युक्तीवाद करत असल्याचे म्हणत सुनावले )

पंतप्रधान मोदी घेणार द्विपक्षीय बैठका -

पंतप्रधान मोदी शिखर परिषदेदरम्यान अनेक द्विपक्षीय बैठकाही घेऊ शकतात. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.