Afghanistan: अफगाणिस्तानवर असणार आता तालिबानचे वर्चस्व, अशरफ गनी यांनी अली अहमद जलाली यांना सोपवली सत्ता- सुत्र
Afghanistan flag | File Image | (Photo Credits: Getty Images)

Afghanistan:  अफगाणिस्तानवर आता तालिबान्यांचे वर्चस्व असणार आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे. सुत्रांनुसार, रविवारी नवे अंतरिम सरकारच्या प्रमुख रुपात अली अहमद जलाली यांना निवडण्यात आले आहे. ताबिलानला सत्ता हस्तांतरित करण्यासाठी अफगाण प्रेसिडेंसियशल पॅलेस एआरजी सोबत सोबत बातचीत सुरु आहे. खामा प्रेस न्यूज एजेंसी यांनी सांगितले की, राष्ट्रीय वाद मिटवण्यासाठी उच्च परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्या बद्दल असे बोलले जात आहे की, ते या प्रक्रियेत मध्यस्थी करत आहेत.

सुत्रांनी पुढे असे ही म्हटले आहे की, अली अहमद जलाली यांना नव्या अंतरिम सरकार प्रमुखच्या रुपात नियुक्त केले जाणार आहे. द खामा प्रेस न्यूज एजेंसीने ही माहिती दिली आहे. याच दरम्यान, आंतरिक आणि विदेश प्रकरणात कार्यवाहक मंत्र्यांनी अब्दुल सत्तार मिर्जाकवाल यांनी विविध व्हिडिओ क्लिपमध्ये आश्वासन दिले की, काबुल मधील लोकांना सुरक्षितता पुरवली जाणार. कारण ते आंतरराष्ट्रीय मित्रांसोबत शहराचे रक्षण करत आहेत. मिर्जाकवाल यांनी असे म्हटले की, काबुलवर हल्ला केला जाणार नाही. मिर्जाकवाल यांनी काबुल स्थानिकांना आश्वासन दिले की, सुरक्षा बल शहराची सुरक्षा सुनिश्चित करणार आहे.

याआधी तालिबानने एका विधानात काबुल मधील स्थानिकांना घाबरण्याचे आश्वासन दिले नव्हते. कारण त्यांचे लक्ष्य अफगाण राजधानीत सैन्य रुपात प्रवेश करणे हे नव्हतेच. त्यांनी शांतिपूर्ण मार्गाने सत्ता हस्तांतरण करण्याबद्दल म्हटले.(Afghanistan-Taliban Conflict News: अफगाणिस्थानातील अनेक राज्य ताब्यात घेतल्यानंतर आता तालिबानांची काबुलकडे वाटचाल, राजधानी काबुलच्या बाहेरील भागात केला प्रवेश)

दरम्यान, तालिबानने प्रत्येक बाजूने आज अफगाणची राजधानी काबुल मध्ये प्रवेश केला. याचवेळी त्यांना अत्यंत कमी विरोधकांचा सामना करावा लागला. टोलो न्यूजच्या रिपोर्ट्स नुसार, तालिबानने आता आपल्या सदस्यांना काबुल गेट जवळ वाट पाहण्यासह शहरात प्रवेश न करण्याचे आदेश दिले आहेत. तर रुस, अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची एक आपत्कालीन बैठक बोलावण्यावर काम करत आहे. अफगाणिस्तानसाठी रुसचे विशेष राष्ट्रपतींचे प्रतिनिधी जमीर काबुलोव यांनी रविवारी असे म्हटले की, आम्ही बैठक बोलावणार आहोत. मात्र यामुळे स्थिती बदलणार नाही. याबद्दल आम्हाला आधीच विचार करायला पाहिजे होता आणि आता बैठक करावी लागली नसती.