जगात पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या लसींच्या कॉकटेलवर अभ्यास; Sputnik V आणि AstraZeneca ची लस दिली एकत्र, जाणून घ्या परिणाम
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-IANS)

कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) संरक्षण मिळवण्यासाठी एकाच लसीचे दोन डोस दिले जात आहेत. काही ठिकाणी आता तिसरा बुस्टर डोस देण्यासही सुरुवात झाली आहे. याआधी असा समज होता की, दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेतल्यानंतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. स्पुतनिक व्ही लसीचे (Sputnik V Vaccine) मुख्य समर्थक रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने दोन लसींच्या संयोजनाच्या वापराबाबत अझरबैजानमध्ये आयोजित केलेल्या जगातील पहिल्या अभ्यासाचे सुरक्षा परिणाम जाहीर केले.

स्पुतनिक व्ही लस आणि एस्ट्राझेनेका लसीच्या (AstraZeneca Vaccine) संयोगाची सुरक्षा आणि रोगप्रतिकारकतेवरील अभ्यास अझरबैजानमध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू झाला होता. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस आणि रशियाच्या स्पुतनिक लाइट व्हॅक्सीनवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, या लसींचे कॉकटेल वापरल्यानंतर लसींचे कोणतेही वाईट किंवा गंभीर परिणाम दिसले नाहीत. इतकेच नाही तर यानंतर कोरोनाचे कोणतेही प्रकरण समोर आले नाही.

आरडीआयएफने सांगितले, 'आतापर्यंत 50 स्वयंसेवकांना लसांची कॉकटेल देण्यात आली आहे आणि नवीन सहभागींनाही चाचणीमध्ये सामील होण्यासाठी बोलावण्यात आले आहे. डेटाचे अंतरिम विश्लेषण लसीच्या एकत्रित वापरासाठी उच्च सुरक्षा प्रोफाइल दर्शवते, ज्याचे कोणतेही गंभीर परिणाम झाले नाहीत.

आरडीआयएफ आणि त्याचे भागीदार, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस आणि स्पुतनिक व्ही लसचे फर्स्ट कंपोनंट वापरुन अझरबैजानमध्ये ऑगस्टमध्ये रोगप्रतिकारकपणाविषयी प्राथमिक डेटा प्रकाशित करतील. आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी अलीकडील व्हर्च्युअल न्यूज ब्रीफिंगमध्ये सांगितले की स्पुतनिक व्ही चे विकसक 'मिक्स अँड मॅच' स्वरूपात अॅस्ट्राझेनेका डोससह लस त्यांची वापरण्याचा विचार करीत आहेत. (हेही वाचा: कोरोना विषाणूच्या Delta Variant ने वाढल्या चिंता; Chickenpox प्रमाणे अतिवेगाने पसरू शकतो संसर्ग- Report)

दरम्यान, इतर अनेक देशांमध्येही लसीच्या संयोजनाच्या क्लिनिकल चाचण्या केल्या जात आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्वयंसेवकांचे लसीकरण केले जात आहे. तर रशिया आणि बेलारूसमध्ये अशा चाचण्या आयोजित करण्यासाठी नियामक मान्यता देण्यात आली आहे.