मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईद (Hafiz Saeed) याला पाकिस्तान कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. तर दहशतवाद्यांना अर्थसहाय्य (Terror Financing Case) केल्याचा आरोप सिद्ध झाला असून 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात लाहौर येथील एटीसीने जमात-उद-दावा या संघटनेचा सुत्रधार आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या विरोधात दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याप्रकरणी निर्णय सुरक्षित ठेवला होता. हे प्रकरण सीटीडी आणि लाहौरसह गुजरांवाल शाखांकडून दाखल करण्यात आले होते.
सीटीडीच्या गुजरांवाला यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाची सुरुवातीला एटीसी मध्ये सुनावणी झाली. मात्र लाहौर हायकोर्टाच्या निर्देशनानुसार तो पुढे ढकलला होता. दोन्ही प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने 23 साक्षीदारांची साक्ष सुद्धा लेखी लिहून घेतली होती.(जैश-ए-मोहम्मद संघटना भारतावर हल्ला करण्यासाठी देतेय बालाकोट येथे 27 दहशतवाद्यांना ट्रेनिंग)
A Pakistan court convicts Jamat-ud-Dawa chief (JuD) Hafiz Saeed for 5 years in terror financing cases. (file pic) pic.twitter.com/NeokVilX4p
— ANI (@ANI) February 12, 2020
हाफिज सईद याला गेल्या वर्षात जुलै महिन्यात सीटीडी द्वारे अटक करण्यात आले होते. सईद याच्या अटकेपूर्वी जेडयू नेत्यांच्या विरोधात 23 प्राथिमिक सीटीडी पोलीस स्थानक लहौर, गुजकांवाला, मुल्तान, फैसलाबाद आणि सरगोधा येथे जुलै 2019 मध्ये दाखल करण्यात आली होती. यामध्ये सईद आणि जेडयूचा एक अन्य प्रमुख दहशतवादी सुद्धा सहभागी आहे. डॉन न्यूज यांच्या मते, सईद याने ट्रस्ट आणि अनधिकृत संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळवलेला पैसा एकत्र करुन दहशतवाद्यांना पुरवत होता.