Jamie Dimon (संग्रहित संपादित प्रतिमा)

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती तरुणांना आठवड्यातून 70-80 तास काम करण्याचा सल्ला देत असताना, मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी बँक जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमॉन (Jamie Dimon) यांनी, भविष्यात लोक 3.5 दिवस काम करतील असे सांगितले आहे. जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डिमन एआय (AI) बद्दल खूप सकारात्मक आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) लोकांच्या नोकऱ्या काढून घेईल, अशा अंदाजांना त्यांनी चुकीचे म्हटले आहे. डिमनचा असा विश्वास आहे की, एआय केवळ व्यवसाय सुधारत नाही तर कर्मचाऱ्यांचे कार्य-जीवन संतुलन देखील सुधारत आहे. यामुळे लोक आठवड्यातून कमी दिवस काम करतील.

डिमॉन हे जुन्या पद्धतीच्या कामाच्या पद्धतींचे समर्थक आहेत, जसे की कठोर परिश्रम आणि कार्यालयीन वेळ. मात्र आता अहवालानुसार, एआयमुळे पुढील पिढ्यांना आठवड्यातून साडेतीन दिवसच काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्मचाऱ्यांचा 60% ते 70% वेळ घेणारी कार्ये एआयद्वारे  स्वयंचलित केली जातील, ज्यामुळे कर्मचाऱ्यांकडे बराच वेळ असेल.

ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत डिमॉन म्हणाले, 'कमी वेळ काम केल्याने तुमची मुले 100 वर्षांपर्यंत जगतील आणि त्यांना तंत्रज्ञानामुळे कर्करोग होणार नाही. कदाचित ते आठवड्यातून फक्त साडेतीन दिवस काम करतील.’ डिमॉन यांचा विश्वास आहे की, कामकाजाचा आठवडा पाच दिवसांवरून साडेतीन दिवसांपर्यंत कमी होईल. अमेरिकेतील सर्वात मोठी बँक असलेल्या जेपी मॉर्गनने तिच्या अनेक फंक्शन्समध्ये आधीच एआय समाविष्ट केले आहे. या कार्यांमध्ये चुका शोधणे, व्यापार, संशोधन आणि हेजिंग यांचा समावेश होतो. वृत्तानुसार, ते म्हणाले की, आगामी काळात त्यांना एआयच्या आधारे व्यवसायात मोठ्या सुधारणा आणि कर्मचाऱ्यांचे काम-जीवन संतुलन वाढताना दिसत आहे. त्यांनी एआयच्या क्षमतेचे कौतुक केले आणि सांगितले की ते व्यवसाय करण्याच्या पद्धतीत बदल करू शकते. (हेही वाचा: OpenAI GPT-4 Turbo Updates: प्रतिभासंपन्न लिखाण क्षमतेसह ओपएाय चॅट जीपीटी-4 होतंय अद्ययावत; जाणून घ्या नवे बदल)

दरम्यान, अनेक क्षेत्रात एआयबद्दल भीती आहे की ते मानवांची जागा घेईल. तंत्रज्ञानामुळे अंदाजे 300 दशलक्ष नोकऱ्या नष्ट होतील असा अंदाज गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे. जवळपास एक चतुर्थांश यूएस कामगारांना भीती वाटते की, एआय भविष्यात त्यांच्या नोकऱ्या काढून घेईल. मात्र, डिमॉन नमूद केले की, तंत्रज्ञानाच्या प्रगतीप्रमाणे समाज बदलत आहे. ते म्हणाले की एआय आणि मोठ्या भाषेचे मॉडेल जीवनमान सुधारण्यासाठी मोठ्या संधी देतात.