जगभरात कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक पातळीवर थैमान घातलेल्या विषाणूमुळे अनेक अफवा पसरत आहेत. या अफवांमुळे इराणमध्ये (Iran) 27 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत 5 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी इराणमध्ये अनेक अफवा पसरत आहेत.
मिथेनॉल प्राशन (Methanol Poisoning) केल्याने कोरोनाची लागण होत नाही, अशी अफवा इराणमध्ये सध्या जोर धरत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी इराणमधील नागरिकांनी मिथेनॉलचे प्राशन केले. त्यामुळे तब्बल 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये एका दिवसात 49 लोकांचा मृत्यू, भारतामध्ये 34 प्रकरणे; Facebook ने बंद केली लंडन आणि सिंगापूरची कार्यालये)
भारतातदेखील अनेक लोक कोरोनापासून वाचण्यासाठी वेगवेगळे सल्ले देत आहेत. काही दिवसांपूर्वी एका दिग्गज नेत्याने कोरोनापासून वाचण्यासाठी गोमुत्र पिण्याचा सल्ला दिला होता. तसेच अनेक योगासने केल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही, असंही म्हटलं जात आहे. परंतु, या केवळ अफवा आहेत. कारण कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे.
इटली देशातून भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे. भारतात आढळलेल्या 45 कोरोनाबाधितांपैकी 35 जण हे इटलीतील नागरिक आहेत. इटलीतून मायदेशात आल्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 7375 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 366 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.