रायगडावर 6 जून 1674 रोजी झालेला 'शिवराज्याभिषेक सोहळा'  हा रायगडावर आलेल्या प्रत्येकासाठी जणू दसरा-दिवाळीच्या उत्सवासारखाच होता. लाडक्या राजाला सिंहासनावर बसलेला पाहण्यासाठी असंख्य जनता रायगडावर उपस्थित होती. शिवराज्याभिषेक सोहळा ज्यांनी याचि देही याचि डोळा अनुभवला त्या प्रत्येकाच्या मनात आपण धन्य झालो ही एकच भावना होती.