(Representative Image)

महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात एका व्यक्तीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर (WhatsApp Group) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करत स्थानिकांनी त्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्याला अटकही केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  पोलिसांच्या माहितीनुसार, 28 एप्रिल रोजी नालासोपारा पूर्वेकडील विजय नगर भागातील एका गृहनिर्माण सोसायटीत आरोपी अक्षयदीप भरतकुमार विसावाडिया (Akshaydeep Bharatkumar Visawadiya) याला मारहाण करण्यात आली.

एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर गुजराती आणि मराठी ओळखींबद्दल जोरदार चर्चा झाली होती, त्यादरम्यान आरोपींने शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांच्या एका गटाने विसावाडिया यांच्याशी वाद घातला. त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल विधान करणार्‍यांना जरब बसवण्याच्या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली अमित शाहांची भेट; 10 वर्षांची शिक्षा, अजामिनपात्र विशेष कायदा करण्याची मागणी.

सोशल मीडीया मध्ये मारहाणीचा व्हिडिओ देखील वायरल झाला आहे. दरम्यान तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी विसावाडिया यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये), 356(2) (बदनामी) आणि 352 (शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूद्ध FIR दाखल केला आहे.