Raja Shivaji Logo Contest | Inastagram

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आगामी 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. सध्या या सिनेमाचं काम सुरू असताना आता रितेशने या सिनेमाच्या लोगो डिझाईन साठी खास ग्राफिक डिझायनर्स, टायपोग्राफिक्सना आवाहन केलं आहे. सिनेमाचं लोगो डिझाईन करून डिझायनर्सना या सिनेमासोबत स्वतः नाव जोडता येणार आहे. 'राजा शिवाजी' हा सिनेमा Mumbai Film Company आणि जिओ स्टुडिओ कडून बनवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतलेला आहे.

रितेशने खास लोगो डिझाईन कॉन्टेस्ट बद्दल माहिती देताना डिझायनर्सना देवनागरी आणि रोमन इंग्लिश मध्ये सिनेमाचा लोगो पाठवण्याचं आवाहन केले आहे. contact@mfco.in वर डिझाईन पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्या डिझाईनची निवड केली जाईल त्यांना त्याचं क्रेडिट दिलं जाईल असे व्हिडिओ मध्ये त्याने सांगितलं आहे. नक्की वाचा:  Raja Shivaji First Poster: Riteish Deshmukh कडून शिवजयंती दिनी 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा; पहा पोस्टर.  

'राजा शिवाजी' साठी लोगो डिझाईन कॉन्स्टेस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शन देखील रितेश देशमुख करणार आहे. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेमा आहे. 2022 साली त्याने वेड हा पहिला मराठी सिनेमा केला होता. 'राजा शिवाजी' सिनेमा मराठी आणि हिंदी मध्ये रीलीज होणार आहे. सध्या सिनेमाचं दुसरं शेड्युल सुरू झालं आहे. मुंबई मध्ये फिल्म सिटीमध्ये खास सेट उभारण्यात आला आहे.