
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025 Messages: मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली, कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य-राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवरायांचे निधन 3 एप्रिल 1680 मध्ये झाले. इंग्रजी कॅलेंडरनुसार अनेक शिवभक्त याचं दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी करतात. मात्र, अनेक शिवप्रेमी शिवाजी महाराजांची तिथीनुसार येणारी पुण्यतिथी (Chhatrapati Shivaji Maharaj Tithinusar Punyatithi) साजरी करतात. 12 एप्रिल रोजी शिवाजी महाराजांची तिथीनुसार येणार पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Quotes द्वारे करा तुम्ही शिवबाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता.
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा..
छत्रपती शिवाजी महाराज
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

पराक्रमी योद्धा,
कुशल रणनीतिकार,
वीर महानायक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!

भगव्याची ज्यांनी राखली शान
मुघलांपुढे कधीही न झुकविली त्यांनी मान
ज्यांच्या शौर्यापुढे आपण आहोत सूक्ष्म जीवासमान
अशा शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी दिनी करुया त्यांस कोटी कोटी प्रणाम!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता..
जय भवानी.. जय शिवाजी..
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

जगणारे ते मावळे होते..
जगवणारा तो महाराष्ट्र होता..
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा
'आपला शिवबा' होता.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त
विनम्र अभिवादन...!

शिवाजी महाराजांनी अनेक लढाल्या त्यांच्या गनीमी कावा या युद्धिनितीच्या साहाय्याने जिंकल्या. शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे.