देशात कोरोना सावटाखाली यंदा बोर्डाची परीक्षा कशी पार पडणार अशी चर्चा होती पण आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर यावर्षी 10वीची परीक्षा रद्द करत असल्याची तर 12वीची परीक्षा लांबणीवर टाकत असल्याची माहिती दिली आहे. रमेश पोखरीयाल यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे.