Representational Image (Photo Credits: alexisrbrown.com/ unsplash.com)

भारतामधील कोरोना वायरसचा वाढता विळखा पाहता आता सीबीएससी पाठोपाठ आयसीएसई बोर्डाने देखील त्यांच्या 10वी,12वीच्या परीक्षांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार देशभरात 4 मे पासून सुरू होणारी यंदाची त्यांची 10 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर 12 वी ची परीक्षा अद्यापही स्थगित आहे. पुढील काही दिवसांनी 12वी च्या ऑफलाईन परिक्षेबाबत आणि त्यांच्या तारखांबाबत निर्णय घेतला जाईल असं बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.Maharashtra SSC, HSC 2021 परीक्षा रद्द केल्याचे वृत्त वर्षा गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून वायरल; शालेय शिक्षणमंत्र्यांनी अफवांना बळी न पडण्याचं केलं आवाहन.

CISCE ने परिपत्रक जारी करताना, विद्यार्थी आणि शिक्षक यांचं आरोग्य आणि सुरक्षितता हे आमचं प्राधान्य असल्याने यंदा कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता आम्ही 10 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत. दहावीच्या सार्‍या विद्यार्थ्यांना आता objective criterion म्हणजेच अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनेच वर्गोन्नती दिली जाणार आहे. यंदा 11 वीचे वर्ग देखील ऑनलाईन माध्यमातून सुरू करण्याचे निर्देश परिपत्रकामध्ये देण्यात आले आहेत.

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप परीक्षेचा निर्णय झालेला नाही. 16 एप्रिलच्या परिपत्रकानुसारच सध्या निर्णय ठेवण्याचे निर्देश आहेत. म्हणजेच सध्या ही परीक्षा स्थगित आहे. बोर्डातून 12 च्या ऑफलाईन परीक्षा या लवकरच घेतल्या जाणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना परिस्थिती पाहून त्याबाबतचा निर्णय होईल असे सांगण्यात आले आहे.

ANI Tweet

सध्या सीबीएसई बोर्डाने देखील 10 वीच्या परीक्षा रद्द करून 12 वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मे च्या शेवटी 12वी आणि जून महिन्यात 10वीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इतर बोर्डाच्या गुणदान पद्धतीचा अभ्यास केला जाणार असल्याचंही सांगितलं आहे.