CBSE Board Exams 2021 Update: वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची 10 वीची परीक्षा रद्द; 12 वी ची परीक्षा लांबणीवर
Representational Image | (Photo Credits: PTI)

देशामध्ये दिवसागणिक वाढती कोरोना रूग्णसंख्या आता पालक आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी होती. देशात कोरोना सावटाखाली यंदा बोर्डाची परीक्षा कशी पार पडणार अशी चर्चा होती पण आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर यावर्षी 10वीची परीक्षा रद्द करत असल्याची तर 12वीची परीक्षा लांबणीवर टाकत असल्याची माहिती दिली आहे. रमेश पोखरीयाल (Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank) यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान 10 वीची परीक्षा रद्द झाल्याने त्यांचा निकाल objective criterion च्या आधारे बनवला जाणार आहे. तर 12वीच्या परीक्षेवर अनेक विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण अवलंबून असल्याने सध्या सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहे. 1 जून नंतर देशातील कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या परीक्षेबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असेदेखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान 10 वीचे विद्यार्थी इंटर्नल असेसमेंट द्वारा 10 वी  पास  करून त्या6ना वर्गोन्नती दिली जाणार आहे पण ते याबाबत नाखूष असल्यास त्यांच्यासाठी कोरोना स्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.

ANI Tweet

महाराष्ट्रामध्ये राज्य शिक्षण मंडळाने 23 एप्रिल पासून होणारी 10वी, 12वीची परीक्षा पुढे ढकलली आहे. 10 वी,12वीच्या परीक्षा राज्यात महाराष्ट्र बोर्ड मे-जून मध्ये घेणार आहे पण त्याचे वेळापत्रक जारी केलेले नाही. Maharashtra SSC, HSC 2021 परीक्षा रद्द केल्याचे वृत्त वर्षा गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून वायरल; शालेय शिक्षणमंत्र्यांनी अफवांना बळी न पडण्याचं केलं आवाहन.

 

दरम्यान आज देशात मागील 24 तासांत 1,84,372 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे तर 1027 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.