Varsha Gaikwad | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र सह देशभरात वाढती कोरोना रूग्णसंख्या आता चिंतेची बाब ठरत आहे. दरम्यान सध्याचा काळ हा परीक्षेचा आहे. पण कोविड परिस्थिती पाहता म महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाने आता 10वी,12 वीचे पेपर पुढे ढकलले आहेत. महाराष्ट्र राज्य बोर्डाप्रमाणेच आता सीबीएसई, आयबी बोर्ड आणि CISCE बोर्डाच्या प्रस्तावित परीक्षा देखील पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करताना महाविकास आघाडी सरकार साठी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता असल्याने सध्य स्थिती पाहता महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्ड वगळता इतर बोर्डांनीदेखील त्यांच्या परीक्षा रिशेड्युल कराव्यात असं आवाहन केले आहे. तसेच ही इतर बोर्ड्सदेखील या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतील असे देखील म्हटलं आहे.

महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या 23 एप्रिल पासून सुरू होणार्‍या 10वी, 12वीच्या परीक्षा यंदा पुढे ढकलल्या असून 12वीच्या मे 2021 अखेरीस तर 10वीच्या जून महिन्यात होतील असे सांगण्यात आले आहे. अद्याप त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झालेले नाही. पण लवकरच ते प्रसिद्ध केले जाईल असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी खासदार अरविंद सावंत यांनी देखिल पत्र लिहूनकेंद्रीय शिक्षणमंत्र्यांना सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार करण्याबाबत सुचवले आहे. CBSE Board Exams 2021: सीबीएसई च्या 10वी, 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा, रद्द करण्याचा अद्याप विचार नाही, बोर्डाच्या अधिकार्‍यांची माहिती.

वर्षा गायकवाड ट्वीट

आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द करण्याबाबत विचार करण्याबाबत म्हटलं आहे. अन्यथा या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून किंवा इंटरनल असेसमेंट/ ऑनलाईन माध्यमातून घ्याव्यात असं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडीयामध्येही बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.