Maharashtra Board Exams 2021 Postponed: इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या, राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आज (सोमवार, 12 एप्रिल) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील इयत्ता 10 वी आणि इयत्ता बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात (Maharashtra Board Exams 2021 Postponed) आल्या आहेत.

Maharashtra Board Exams 2021 Postponed: इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या, राज्य सरकारचा निर्णय
Varsha Gaikwad and SSC-HSC Exam (Photo Credits: FB/File Image)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आज (सोमवार, 12 एप्रिल) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील इयत्ता 10 वी आणि इयत्ता बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात (Maharashtra Board Exams 2021 Postponed) आल्या आहेत. आता नव्या निर्णयानुसार इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कोणत्या तारखेला होणार याबाबत निश्चित स्पष्टता नाही. परंतू, इयत्ता दहावीची परीक्षा जून महिन्यात बारावीची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. राज्याच्या शिक्षण विभागासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला.

राज्यात परीक्षांबाबत गेल्या एक महिन्यांपसून खल पाहायला मिळत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा एक गट परीक्षा नियोजीत वेळेनुसार घ्याव्यात असे म्हणत होता. तर एक गट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत होता. अखेर बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयही नुकताच घेतला आहे. एमपीएससीने सुरुवातीला हा निर्णय जाहीर केला तेव्हा विद्यार्थ्यांनी मोठा विरोध दर्शवला होता. परंतू, एपमीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेतला तेव्हा विद्यार्थ्यांनी फारसा विरोध केला नाही. (हेही वाचा, CBSE Board Exams 2021: सीबीएसई च्या 10वी, 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा, रद्द करण्याचा अद्याप विचार नाही, बोर्डाच्या अधिकार्‍यांची माहिती)

दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीबाबत निर्णय जाहीर करताना एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत गायकवाड यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांचे आरोग्य ही सरकार म्हणून आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या. परंतू, सीबीएसईसारख्या इतर बोर्डांचा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाव्यतिरीक्त इतरही बोर्डास आम्ही सांगणार आहोत की, परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.

(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2021 03:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).