YouTube (Photo Credits: Getty Imgaes)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संबंधित खोटे दावे खोडून काढण्याच्या उद्देशाने, व्हिडिओ-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने (YouTube) गेल्या सहा महिन्यांत कोविड-19 लसविषयी चुकीची माहिती शेअर करणारे 30 हजार हून अधिक व्हिडिओ आपल्या व्यासपीठावरून हटवले आहेत. आहेत. अ‍ॅक्सिओसच्या (Axios) अहवालानुसार, व्हिडिओ-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने फेब्रुवारी 2020 पासून कोविड-19 बाबत चुकीची माहिती देणारे 800,000 हून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत. असे व्हिडिओ प्रथम कंपनीच्या एआय सिस्टम किंवा मानवी पुनरावलोकनकर्त्यांद्वारे चिन्हांकित केले जातात, नंतर दुसर्‍या स्तरावर त्याबाबत पुनरावलोकन करून निर्णय घेतला जातो.

अहवालात म्हटले आहे की, लस धोरणाचे उल्लंघन करणारा व्हिडिओ कंटेंट यूट्यूबच्या नियमांनुसार काढून टाकण्यात आला आहे. फेसबुक आणि ट्विटरसह इतर प्लॅटफॉर्मनेही अशा कंटेंटचा प्रसार आणि पोहोच कमी करण्यासाठी धोरणे आखली आहेत. अलीकडेच मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने कोविड-19 लसीकरणाबाबत दिशाभूल करणार्‍या ट्वीटविरूद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये खाते निलंबितही केले जाऊ शकते. यूट्यूबच्या प्रवक्त्या एलेना हर्नांडेझ यांनी ही आकडेवारी शेअर केली. कंपनीने प्रथमच याबाबत डेटा शेअर केला आहे. अ‍ॅक्सिओसने केलेल्या सर्वेक्षणात, सुमारे 30% अमेरिकन लोकांना लसीबाबत शंका असल्याचे निदर्शनास आले आहे.

(हेही वाचा: Spotify आता 12 भारतीय भाषांना करणार सपोर्ट, कंपनीने आणले नवे अपडेट)

ट्विटरने म्हटले आहे की, कोविड-19 बाबत मोहीम सुरू झाल्यापासून त्यांनी 8,400 हून अधिक ट्विट हटवली आहेत आणि जगभरातील 15.5 दशलक्ष खात्यांवरही कारवाई केली आहे. सध्या जगभरात कोरोना लसीबाबत सोशल मीडियावर सर्व प्रकारचा प्रचार सुरू आहे. त्यात कोरोना लसीबाबतही अफवा पसरलेल्या आहेत, म्हणूनच लसीकरणामध्ये सुरूवातीस सुस्तपणा दिसून आला. अनेकदा अफवांवरुन विरोधकांनी सरकारकडे स्पष्टीकरणही मागितले. मात्र आता स्वतः पंतप्रधानांनी लस घेतल्यामुळे ही मोहीम वेगवान होत आहे. लसीचे दुष्परिणाम आणि धार्मिक पैलूंशी संबंधित अफवा सोशल मीडियावर अधिक पसरल्या जात आहेत.