Spotify आता 12 भारतीय भाषांना करणार सपोर्ट, कंपनीने आणले नवे अपडेट
Spotify (Photo Credits-Twitter)

म्युझिक स्ट्रिमिंग अॅप Spotify ने आपल्या युजर्सला उत्तम अनुभव देण्यासाठी एक नवे अपडेट रोलआउट केले आहे. आता या अपडेट नंतर हे अॅप हिंदी, गुजराती, मल्याळमसह 12 भारतीय भाषांना सपोर्ट करणार आहे. त्यामुळे अॅपमध्ये एकूण 62 भाषांचा समावेश झाला आहे. नव्या भाषांचा वापर करण्यासाठी स्पोटीफाय अॅप अपडेट करावे लागणार आहे. त्यानंतरच युजर्सला आपल्या प्रादेशिक भाषेत गाण्यांचा आनंद घेता येणार आहे.(WhatsApp वर सुद्धा पाहता येणार Instagram Reels, कंपनीकडून नव्या  फिचरच्या टेस्टिंगची सुरुवात)

Spotify म्ध्ये ज्या 12 भारतीय भाषांचा समावेश केला आहे त्यात हिंदी, गुजराती, भोजपुरी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगु, उर्दू आणि बंगाली भाषा आहे. त्यामुळे आता 62 भाषा म्युझिक अॅपमध्ये अॅड झाल्या आहेत. कंपनीचे असे म्हणणे आहे की, आपल्या युजर्सला बेस्ट ऑडिओ कंटेट देण्यासाठी हे अपडेट रोलाउट केले आहे. कंपनीने अशी अपेक्षा केली आहे की या नव्या अपडेटमुळे अधिकाधिक लोक जोडली जाऊ शकतात.(YouTube आता अमेरिकेच्या बाहेरील Creators ना आकराणार टॅक्स; अशी आहे योजना)

स्पोटीफाय पहिल्यांदाच 2008 मध्ये लॉन्च केले होते. या अॅपमध्ये 6 कोटींहून अधिक गाणी उपलब्ध आहेत. या अॅपचा वापर भारतासह 93 देशात केला जातो. सर्व देशातील युजर्सची संख्या मिळून 32 कोटी युजर्स आहेत. कंपनीचे असे म्हणणे आहे की, गेल्या 6 वर्षात या अॅपच्या माध्यमातून पॉप गाणी ऐकणाऱ्या युजर्सच्या संख्येत 2 हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे.