WhatsApp वर सुद्धा पाहता येणार Instagram Reels, कंपनीकडून नव्या  फिचरच्या टेस्टिंगची सुरुवात
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

इंस्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर युजर्सला विविध चॅटिंगचे ऑप्शन उपलब्ध आहेत. त्याचसोबत युजर्ससाठी कंपनीकडून नवे स्टिकर्स, नव्या फिचर्ससह चॅटिंगचा अंदाज सुद्धा अधिक मजेशीर बनवण्याचा प्रयत्न केला जातो. अशातच आता कंपनी लवकरच व्हॉट्सअॅपवर इन्स्टाग्रामवरील रिल्स पाहता येण्यासंबंधित फिचरचे टेस्टिंग करत आहे. त्यामुळे युजर्सला येत्या काळात व्हॉट्सअॅपवर इन्स्टाग्राम रिल्सचे एक टॅब सुद्धा मिळणार असून तेथे त्या पाहता येणार आहेत.(WhatsApp चॅट लीक होण्याची भीती होणार दूर; कंपनी लवकरचं अपडेट करत आहे 'हे' फीचर)

WABetainfo च्या रिपोर्ट्सनुसार, येत्या दिवसात व्हॉट्सअॅप युजर्सला अॅप मध्ये एक वेगळे टॅब दिसून येणार आहे. ज्यावर क्लिक केल्यास त्यांना व्हॉट्सअॅपवर इन्स्टाग्राम रिल्स पाहता येणार आहेत. रिपोर्टमध्ये हे सुद्धा सांगण्यात आले आहे की, कंपनीने अधिकृत पद्धतीने आपल्या अपकमिंग फिचर बद्दल कोणतीच घोषणा केलेली नाही. मात्र अशी अपेक्षा आहे की युजर्सला त्यासाठी अधिक वेळ वाट पहावी लागणार नाही आहे.(WhatsApp मध्ये लवकरचं येणार लॅपटॉप वरून व्हिडीओ व व्हॉईस कॉल करण्याचं फीचर; 'या' वापरकर्त्यांना मिळेल प्रथम सुविधा)

दरम्यान, व्हॉट्सअॅपकडून अन्य काही नव्या फिचरवर सुद्धा काम केले जात आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप ऑडिओ मेसेज संबंधिक एक खास फिचरचा समावेश आहे. ज्याच्या मदतीने युजर्सला ऑडिओ मेसेजसाठी रिड रिसीट बंद करता येणार आहे. हे iOS वर एक नवे अपडेट सुद्धा आणले असून जे वॉइज मेसेजसाठी एक नवे अॅनिमेशन आणि वॉइस मेसेज रिसिप्ट सुद्धा डिसेबल करण्यासारखे फिचर्स आणले आहेत.