WhatsApp चॅट लीक होण्याची भीती होणार दूर; कंपनी लवकरचं अपडेट करत आहे 'हे' फीचर
WhatsApp | Representational Image (Photo Credits: Pixabay)

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप चॅटिंगसाठी सुरक्षित व्यासपीठ आहे. परंतु, असं असलं तरी गेल्या काही वर्षांत बॉलिवूडसह अनेक सेलिब्रिटींचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या विश्वासार्हतेला बरेच नुकसान झाले आहे. हे टाळण्यासाठी, कंपनी आता एक नवीन फिचर आणत आहे. जे पासवर्ड प्रोटेक्टेड चॅट बॅकअप (password-protected chats backup) म्हणून ओळखले जाईल.

या फिचरमुळे व्हॉट्सअॅप चॅटला लीक होण्याचा धोका टाळता येणार आहे. यामुळे आपल्याकडे वैयक्तिक चॅटचा बॅकअप असेल आणि तुमचं अकाऊंट पासवर्ड प्रोटेक्टेड असेल. पासवर्ड प्रोटेक्टेड चॅट बॅकअप हे फिचर कधी सुरू होईल, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. (वाचा - WhatsApp मध्ये लवकरचं येणार लॅपटॉप वरून व्हिडीओ व व्हॉईस कॉल करण्याचं फीचर; 'या' वापरकर्त्यांना मिळेल प्रथम सुविधा)

Android आणि iOS दोन्हीसाठी असेल नवीन फिचर -

WABetaInfo अहवालानुसार नवीनतम बीटा अद्यतन आवृत्ती v2.20.66 आहे. यात प्रोटेक्टेड बॅकअप फीचर पाहिले आहे. या वैशिष्ट्यास क्लाऊडवरील स्टोअर चॅट बॅकअपमध्ये प्रवेश करण्यासाठी संकेतशब्द आवश्यक असेल. WABetaInfo च्या मते, प्रोटेक्टेड बॅकअप फीचर लवकरच Android आणि iOS दोन्ही आवृत्तीसाठी लाँच केले जाईल. चॅट बॅकअपमध्ये प्रवेश करण्यासाठी संकेतशब्द आवश्यक असेल. हा संकेतशब्द किमान 8 वर्णांचा असेल. तसेच यात काही खास अक्षरे आणि संख्या जोडाव्या लागतील.

व्हॉट्सअॅप अनेक नवीन फिचर्सवर काम करत आहे -

व्हॉट्सअॅप इतर अनेक फिचरवरही काम करत आहे. जे येत्या काही दिवसांत सुरू होतील. यात व्हॉट्सअॅप ऑडिओ मेसेजशी संबंधित एक खास फिचरचा समावेश आहे.