WhatsApp वेब युजर्संना लवकरचं लॅपटॉप वरून व्हिडिओ व व्हॉईस कॉल करण्याचं फीचर देण्यात येणार असल्याची चर्चा बर्याच दिवसांपासून आहे. मात्र, आता फीचर लवकरचं रोलआउट होण्याची शक्यता आहेय व्हॉट्सएपशी संबंधित माहिती देताना WABetaInfo च्या नवीन ट्विटनुसार, डेस्कटॉप कॉलिंग सेवा बीटा व्हर्जन यूजर्ससाठी सुरू करण्यात आली असून लवकरच 2.2104.10 वेब / डेस्कटॉप आवृत्ती वापरणारे व्हॉट्सअॅप वापरकर्ते या सेवेचा लाभ घेण्यास सक्षम असतील.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये व्हॉट्सअॅपने निवडक वेब आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा प्रदान केली होती. आता व्हॉट्सअॅप लवकरचं सर्व यूजर्संसाठी हे फीचर रोलआउट करण्याची तयारी करत आहे. ही सेवा आपल्यासाठी लाईव्ह असेल तर आपणास वैयक्तिक चॅट स्क्रीनवर सर्च बटणासह व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंगचे चिन्ह दिसेल. (वाचा - WhatsApp कॉलिंगमुळे जास्त डेटा खर्च होत असेल तर, वापरा 'या' खास ट्रिक)
Wabetainfo ने बीटा यूजर्ससाठी देण्यात आलेल्या व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग फिचरचा स्क्रीनशॉट यापूर्वीचं शेअर केला होता. ज्यात व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल बटण मोबाईलप्रमाणे चॅट हेडरवर दिसत आहेत. अहवालांनुसार, जेव्हा आपल्याला व्हॉट्सअॅप वेबवर कॉल येईल, तेव्हा वेगळी विंडो पॉप अप होईल. ज्याचा वापर करून आपण येणारा कॉल स्वीकारू, नाकारू किंवा दुर्लक्षित करू शकता.
सध्या व्हॉट्सअॅपवर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलची सुविधा केवळ स्मार्टफोनद्वारे शक्य आहे. लवकरचं वापरकर्त्यांना डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर कॉल आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा मिळेल. कॉल करण्यासाठी त्यांना डेस्कटॉप आणि लॅपटॉप वरून फोनवर स्विच करण्याची आवश्यकता नाही. व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल ऑप्शन्स आल्यामुळे व्हॉट्सअॅप वेब वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. व्हॉट्सअॅपने अद्याप या फिचरबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही किंवा ती लोकांपर्यंत कधी उपलब्ध केली जाईल हेदेखील नमूद केलेले नाही.