WhatsApp (Photo Credits: Pixabay)

वेगवान इंटरनेट आल्यापासून भारतात WhatsApp कॉलिंगची मागणी झपाट्याने वाढत आहे. व्हॉट्सअॅप ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग सामान्य व्हिडिओ कॉलिंगपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. तथापि, व्हिडिओ कॉलिंगमुळे फोनचा डेटा लवकरचं संपतो. परंतु, आम्ही तुमच्यासाठी एक मोठी युक्ती आणली आहे, जी व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग दरम्यान डेटाचा वापर वाचवेल. यासाठी वापरकर्त्यांना फोनच्या सेटींगमध्ये काही बदल करावे लागतील. ज्यामुळे तुम्ही व्हिडीओ व ऑडिओ कॉलिंग कमी डेटामध्ये करण्यास सक्षम असाल. वास्तविक व्हॉट्सअ‍ॅपवर लो डेटा वापर फीचर दिले गेले आहे, जे डेटा वापर कमी करण्यासाठी सक्षम असेल. कमी डेटा वापरून WhatsApp कॉलिंग कसे चालू करावे याबद्दल जाणून येऊयात. (वाचा - Tiktok ला टक्कर देण्यासाठी Facebook ने लाँच केलं BARS अॅप; जाणून घ्या काय आहे खास)

व्हॉट्सअ‍पवर कमी डेटा सेटिंग्ज कशी बदलता येईल -

  • वापरकर्त्याने प्रथम त्यांचे व्हॉट्सअॅप उघडले पाहिजे.
  • यानंतर तुम्हाला तीन डॉट्स (मेनू) वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटींग्स ​​पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • जिथे Data and storage usage पर्याय दिसेल.
  • Data and storage usage पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Call Settings पर्याय दिसेल.
  • या खाली, Low Data Usage पर्याय दिसेल. हा पर्याय सक्षम करणे आवश्यक आहे.

Lo Data Usages चे नुकसान -

Lo Data Usages चा वापर चालू केल्यास व्हिडिओ कॉलिंगची गुणवत्ता कमी होते. वास्तविक, व्हॉट्सअॅप अधिक डेटा वापरुन आपल्या कॉलची गुणवत्ता सुधारतो. अशा परिस्थितीत, आपल्याकडे पुरेसा डेटा असल्यास, कमी Lo Data Usages पर्याय बंद ठेवणे योग्य असेल.