शॉर्ट व्हिडीओ बनविणार्या अॅप Tiktok वर बंदी होऊन बराच काळ लोटला आहे. परंतु आतापर्यंत भारतात इतर कोणत्याही शॉर्ट व्हिडिओ तयार करण्याच्या अॅपने टिक्टोकसारखी लोकप्रियता मिळविली नाही. अशातचं आता फेसबुकमार्फत भारतात नवीन शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अॅप बीएआरएस (BARS) लाँच करण्यात आले आहे. शॉर्ट व्हिडिओ बनविणारे हे अॅप बर्याच बाबतीत विशेष आहे. बीएआरएस अॅप सध्या बीटा चाचणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अमेरिकेत हे अॅप अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. पण, लवकरचं ते सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. बीएआरएस अॅप फेसबुकच्या न्यू प्रोडक्ट एक्सपेरिमेंटेशन (NPE) च्या आर आरएंडी टीमने विकसित केले आहे. (वाचा - Telegram Update: टेलिग्रामने लॉन्च केले Auto-Delete Messages सह 'हे' नवे फिचर्स)
BARS अॅपमध्ये काय आहे विशेष -
बीएआरएस अॅप विशेषतः रॅपर्ससाठी डिझाइन केलेले आहे, जे कोणत्याही वापरकर्त्यांना रॅपरसारखे व्हिडिओ सादर करण्यास मदत करते. त्यात प्री-रेकॉर्ड केलेले बिट्स आहेत. यात गाण्यातील यमक विषयी अचूक माहिती देण्यात आलेली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, वापरकर्ते BARS अॅपच्या मदतीने कोणत्याही संगीत वाद्याशिवाय संगीत व्हिडिओ सहज तयार करू शकतील. अहवालानुसार, ऑडियो प्रोडक्शन टूल्स बरेच महाग असतात. अशा परिस्थितीत, बीएआरएस सह आपण अॅपमधील कोणतेही बीट किंवा ट्यून निवडण्यास, गीत लिहण्यास आणि ते स्वतः रेकॉर्ड करण्यास सक्षम असाल.
यापूर्वी Collab हे संगीत अॅप सुरू करण्यात आले होते -
या अॅपमध्ये एक चॅलेंज मोड देखील आहे. अॅपमध्ये क्लिन, ऑटो ट्यून, इमेजनरी फ्रेंड आणि AM रेडिओ सारख्ये अनेक मोड्स देण्यात आले आहेत. आपण BARS चा रॅप व्हिडिओ जतन करण्यात आणि तो थेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास सक्षम असाल. यापूर्वी फेसबुकचे शॉर्ट म्युझिक व्हिडिओ अॅप कोलाब लाँच केले गेले होते. अशात आता फेसबुकने बीएआरएस संगीत अॅप लाँच केले आहे.